गडहिंग्लज – धनंजय शेटके
गडहिंग्लज नगरपालिका व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींच्या साठी बुधवारी शहरातील दहा ठिकाणी महलसिकरण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी पूर्व नोंदणीची आवश्यकता नसुन येईल त्या प्रत्येक नागरिकाला लस देण्यात येणार असून ज्या नागरिकांचे पहिला डोस घेऊन ८४ दिवस झाले आहेत त्यांना दुसरा डोस देखील दिला जाणार आहे.
तसेच शहरातील दहा ठिकाणी मिळून सुमारे तीन हजार डोसचे नियोजन केले आहे.डॉ.एम.एस.बेळगुद्री यांनी अधिक माहिती देताना सांगितले की कोरोना अजून संपलेला नसून तिसऱ्या लाटेचा धोका आपल्याला आहे.त्या वर फक्त लसीकरण हाच एकमेव उपाय आहे त्या मुळे नागरिकांनी न घाबरता न भिता लसीकरण करून घ्यावे, कोरोना हा न दिसणारा शत्रू आहे त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला मास्क,सोशल डिस्टनस,सॅनिटायझर गरजेचा आहे केरळ मध्ये तिसरी लाट आली असून आपण आता पासूनच काळजी घेतली पाहिजे.असे सांगितले.