कागल(विक्रांत कोरे): करनूर रामकृष्णनगर ता.कागल येथील माजी आमदार व अन्नपूर्णा शुगर जागरी वर्क्स चे अध्यक्ष संजयबाबा घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेली श्री. राम व्यवसायिक दूध संस्थेच्या चेअरमनपदी भिकाजी आनंद सुतार तर व्हा. चेअरमन पदी भगवान आत्माराम सुदर्शनी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी चेअरमन बाहुबली सूर्यवंशी होते.

Advertisements

चेअरमन पदासाठी भिकाजी सुतार यांचे नाव अरविंद चौगुले यांनी सुचविले, त्यास बाहुबली सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले. तर व्हा. चेअरमन पदासाठी भगवान सुदर्शन यांचे नाव रावसो बापुसो चव्हाण यांनी नाव सुचविले, त्यास सौ. संगीता रमेश शिरगावे यांनी अनुमोदन दिले. तसेच १ मे कामगार दिन साजरा करून संस्थेतील कर्मचारी महेश नलवडे यांचा सत्कार करण्यात आला. नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Advertisements

निवडी प्रसंगी दिलीप खोत, तुळशीदास घाटगे, बाळासो धनगर, विनायक पाटील, लक्ष्मण गुरव, दीपाली नलवडे आदी उपस्थित होते. आभार संस्थेचे सचिव महेश नलवडे यांनी मानले.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!