भाऊबीज आनंदाचा क्षण – वनश्री रोपवाटीकेच्या स्तुत्य उपक्रमाने साजरा

खुदाई कामगार भगिनी ऊस तोडणी कामगार भगिनी व आरोग्य विभाग भगिनीं समवेत भाऊबीज साजरी

मुरगूड (शशी दरेकर ): आरोग्य विभागाच्या भगिनी जमा झाल्या होत्या .पंचारतीने त्यांनी उपस्थितांना औक्षण केले. उपस्थित बांधवांच्या कडून त्यांना ओवाळणी म्हणून साडी आणि फराळ देणेत आला. अत्यंत भावूक असा हा भाऊबीजेचा कार्यक्रम येथील वनश्री मोफत रोपटिकेच्या कार्यस्थळावर संपन्न झाला. असाच कार्यक्रम ऊस तोडणी कामगार भगिनी व खुदाई कामगार भगिनी यांच्या राहुट्या जेथे जेथे होत्या तेथेही संपन्न झाला.

Advertisements

वनश्री मोफत रोपवाटीकेचे संचालक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी हा उपक्रम गेली १२ वर्षे सातत्यपूर्ण राबवित आहेत. यावर्षी ही येथील वनश्री मोफत रोपवाटीकेच्या कार्य स्थळावर संपन्न झालेल्या या कार्यकमाचे अध्यक्षस्थानी जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासो थोरवत होते. मुरगूड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील डेळेकर , बाळेघोलचे विद्यमान ग्रा. सदस्य सुनिल कोले , उद्योगपती मयुर आंगज यांचे प्रमुख उपस्थितीत रोपवाटीकेच्या माध्यमातून ‘ दिपावली भाऊबीज आनंदाचा क्षण ‘ स्तुत्य उपक्रम अत्यंत सेवाभावी वृतीने जोपासत आहेत.

Advertisements

यावेळी बोलतांना प्रा. डेळेकर म्हणाले , सामाजिकतेचे भान जोपासत वृक्षमित्र सुर्यवंशी यांनी सुरु केलेल्या या उपक्रमास आज एक तप पूर्ण होतेय . याउपक्रमातून श्री . प्रविण सुर्यवंशी यांची उपेक्षित , कष्टकरी , यांचे प्रती असलेली आस्था दिसून येते आहे. वृक्षमित्रांच्या उपक्रमातून आपण साऱ्यांनी प्रेरणा घेतली. पाहिजे.

यावेळी बोलतांना सुनिल कोले म्हणाले , समाजाशी आपली प्रत्येकाची कांही ना कांही बांधिलकी असते . ती सुर्यवंशी यांच्या सारखी कृतीतून जोपासली पाहिजे . समाजाशी आपली नाळ अशा उपक्रमातून जोडली जाते. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संचालक सदाशिव एकल, सिकंदर जमादार, सचिन सुतार, संभाजी भोसले, प्रदीप वर्णे, अरुण पोवार, दयानंद भाकरे , मृत्युंजय सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी , सागर वाडेकर, अवधूत लोहार , रजत चव्हाण, सिद्धेश सुर्यवंशी, गौरव मगदूम, पंकज येरुडकर ,आदीत्य बरकाळे यांचेसह आरोग्य विभाग कर्मचारी भागिनी आदी उपस्थित होते. स्वागत सचीन सुतार यांनी , प्रास्ताविक वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी तर आभार संभाजी भोसले यांनी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!