मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरामधील मध्यवर्ती असणारा जनावरांच्या बाजारामधून नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते मात्र त्या ठिकाणी व्यापारी आणि शेतकरी देत असलेल्या पावतीच्या मानाने त्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नाही.
पावसाळ्यामध्ये या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. ठिक-ठिकाणी पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये येथे येणाऱ्या जनावारांच्या खरेदी -विक्री करणाऱ्या लोकांना रोगराईचा धोका संभोवतो.

मुरगूडचा जनावावारांचा बाजार प्रसिद्ध आहे.या ठिकाणी जनावारानां पाणी पिण्यासाठी कोणत्याही हौदाची सोय नाही या ठिकाणी असणारे थांबे देखील मजबूत नाहीत. रस्ते देखील चिखलाने भरून गेले आहेत. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी व्यापार करणे आणि खरेदी करणे अत्यंत जिकीरीचे होऊन जाते.
मुरगूड नगरपालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवून देणारा हा जनावारांचा अड्डा असुविधांच्या गर्तेत अडकला आहे. या बाबत वेळोवेळी नगरपालिकेला कळवूनही या ठिकाणी सुविधा मिळत नाहीत हीच खंत अनेकांनी बोलून दाखवली आहे.
या ठिकाणी लवकरात लवकर चांगल्या सोयी उपलब्ध करुन मिळाव्यात अशी मागणी यावेळी सुरेश गोधडे, अशोक यादव, शिवाजी खंडागळे, उत्तम पाटील, धोंडीराम बेनिग्रे, रमजान ताशिलदार, तानाजी हसबे, किरण चौगले, प्रकाश दरावर, संदीप चव्हाण, विजय मेंडके, विनायक हसबे, प्रताप सावंत यानीं मुख्याधिकाऱ्यानां निवेदननांव्दारे केली . यावेळी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.