मुरगूडमध्ये राजकीय सभांना बंदी सकल मराठा समाज मुरगूडच्या बैठकीत निर्णय

30 ऑक्टोंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा निर्धार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड शहरांमध्ये जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय सभांना बंदी घालण्याचा तसेच 30 ऑक्टोबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा निर्धार येथील झालेल्या सकल मराठा समाज आणि मुरगुड शहर नागरिकांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

Advertisements

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राजकीय नेत्यांनी वेळोवेळी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा आरक्षणास विलंब लागत असून याबद्दल ठोस निर्णय होत नाही. अंतरवाली सराटी मध्ये मनोज जरांगे पाटील हे सध्या सरकारला दिलेल्या वेळत मराठा आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यामुळे पुन्हा उपोषणास बसले आहेत. राज्यातील वातावरण यामुळे तणावग्रस्त होत आहे.

Advertisements

अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे . याचाच एक भाग म्हणून मुरगूड शहरांमध्ये राजकीय सभांना बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुरगुड शहर हे कागल तालुक्याच्या मध्यवर्ती येत आहे त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावातील ग्रामस्थ या उपोषणास बसणार आहेत असा निर्णय देखील आजूबाजूच्या गावातील उपस्थित ग्रामस्थांनी घेतला आहे.

Advertisements

या शिवतीर्थ येथे साखळी-उपोषणास मुरगुड शहरातील सर्व तरुण मंडळे यांच्यासह धनगर समाज आंदोलनात सहभागी होणार आहे .आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ तसेच सकल मराठा समाजाची कागल तालुक्यातील सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुरगूड शहरासह आजूबाजूच्या गावातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!