मडिलगे(जोतीराम पोवार): वाघापूर तालुका भुदरगड येथील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बबन कांबळे यांची भुदरगड तालुका रिपब्लिकन पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली.
आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र पी एस कांबळे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा अध्यक्ष पांडुरंग कांबळे राधानगरी तालुकाध्यक्ष प्रकाश शिरसेकर कागल तालुका अध्यक्ष सातापा कांबळे तुकाराम कांबळे एस के कांबळे आर एस कांबळे व्ही.जे कदम सुभाष कांबळे यांच्यासह भुदरगड तालुक्यातून आरपीआयचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते बबन कांबळे यांच्या निवडीनंतर फटाक्यांच्या आतषबाजी सह जल्लोष करण्यात आला असून कार्यकर्त्यांमधून उत्साहाचे वातावरण दिसून येत होते