कागल गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस भक्तीभावाने संपन्न

कागल(विक्रांत कोरे) :कालच्या गहिनीनाथांचा उत्सव म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक. मोठ्या भक्ती भावाने गेली चार दिवस सुरू असलेला कागल चा उरूस संपन्न झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाने सर्व धार्मिक उत्सवावर बंदी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धार्मिक उत्सव रद्द करण्यात झाले आहेत. सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले कागलचे ग्रामदैवत गहिनीनाथ हजरत गैबीपीर ऊरुस केवळ पारंपारिक धार्मिक विधी करण्यात आले. शासनाने … Read more

Advertisements

गहिनीनाथ गैबी पीर चरणी मानाचा चौथा गलेफ अर्पण

कागल(प्रतिनिधी) : येथील गहिनीनाथ गैबी पीर चरणी उरूसा निमित्त मानाचा चौथा गलेफ कागल सिनियर घाटगे घराण्याचे वंशज व शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी अर्पण केला. कागल येथील उरूसाचा आज मुख्य दिवस आहे. चौथा गलेफ हा मोठा म्हणून ओळखला जातो. त्याचा मान कागल सिनियर घाटगे घराण्याचा आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात व धार्मिक वातावरणात … Read more

‘अन्नपूर्णा’ च्या वतीने गैबीपीराला गलेफ अर्पण – माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह कुटूंबियांची उपस्थिती

साके : सागर लोहार दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या कागल येथील ग्रामदैवतहजरत गैबीपीर दर्गाच्या ऊरूसानिमित ‘अन्नपूर्णा’ शुगर अँड जॅगरी वर्क्स लिमिटेड केनवडे या कारखान्याच्या वतीने चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे व गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांच्या हस्ते संचालकांच्या उपस्थितीत गलेफ अर्पण करण्यात आला. अन्नपूर्णा कारखाना व घाटगे कुटुंबियांच्या वतीने या गलेफाचे आयोजन करण्यात आले होते. काल बुधवारी … Read more

मुरगूड मधील सचिन कांबळे (गायकवाड) ड्रीम इलेव्हनचा एक कोटीचा मानकरी

मुरगूड ( शशी दरेकर ) : ६ नोव्हेंबर वेळ रात्री १२ ची, ड्रीम इलेव्हन चा ऑIनलाईन निकाल पाहिला. अन चक्क एक कोटीचे बक्षीस जिंकल्याचे सचिन देवबा कांबळे (गायकवाड) (वय -३१,माधवनगर, मुरगूड ) याना समजले. अन अर्धा तास त्याच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा वाहात होत्या. काय करू अन काय नको अशी परिस्थीती, पत्नी प्रियांकाला उठवल आणि ड्रीम … Read more

आदमापूर येथे बाळूमामांची बकरी बुजवणे व लेंढीपूजन कार्यक्रम मानकर्याच्या उपस्थितीत संपन्न

मडीलगे ( जोतिराम पोवार ) : आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामांच्या बकऱ्यांचे पूजन, लेंढीपूजन व बकरी बुजवण्याचा कार्यक्रम धार्मिIक वातावरणात मोजक्याच मानकर्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. येथील मरगुबाई मंदिर परिसरातील भव्य पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रतिवर्षी दीपावली पाडव्यादिवशी मामांच्या बकऱ्यांचे पूजन व बुजवणे असा कार्यक्रम करण्यात येतो. यावर्षी कोरोनामुळे प्रशासनाने मोजक्याच मानकर्यांच्या उपस्थितीत हा … Read more

मुरगूडच्या जान्हवी सावर्डेकर ब्रँड कोल्हापूर’ पुरस्काराने
सन्मानित

मुरगूड ( शशी दरेकर ) : पॉवरलिफ्टिंग मध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये १३ सुवर्ण, ५ रौप्य व २ कांस्य पदके मिळवत उत्कृष्ट कामगिरी करीत कोल्हापुरचे नाव उज्वल केल्याबद्दल मुरगूडच्या कु. जान्हवी जगदीश सावर्डेकरला ‘ब्रँड कोल्हापूर’ पुरस्काराने आज कोल्हापूर येथे मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, आमदार … Read more

वनश्री मोफत रोपवाटीकेच्या वतिने मुरगूड मध्ये आरोग्य विभाग भगिनी, ऊस तोडणी कामगार भगिनी व खुदाई कामगार भगिनींसाठी भाऊबीज समारंभाचे आयोजन

सामाजाचे भान ठेवून उपक्रमांचे माध्यमातून समाज सेवा करणारे वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी – प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार. मुरगूड ( शशी दरेकर ) – आरोग्यविभाग भगिनींसाठी भाऊबीज समारंभ म्हणजे वनश्री मोफत रोपवाटिकेचा सामाजिक ऐक्य जोपासणेचा स्तुत्य उपक्रम होय . या उपक्रमामुळे वनश्री रोपवाटीका म्हणजे असंख्य भगिनीचे माहेरघर बनले आहे .असे समाजिकभान साऱ्यांनी जोपासल्यास समाजमन विकसित व्हायला वेळ … Read more

शिव सहकार सेना तालुका संघटकपदी गुंडाप्पा काशीद

व्हनाळी (सागर लोहार): शिव सहकार सेना कागल तालुका संघटकपदी बेलवळे बुद्रुक ता.कागल येथील गुंडाप्पा राऊ काशीद यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे,संजय पोवार यांचे हस्ते कोल्हापूर सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीत त्यांना देण्यात आले. शिवसेनापक्षप्रमुख ,मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे शिव सहकार अध्यक्षा शिल्पाताई सरपोतदार यांच्या आदेशाने त्यांची नियृक्ती करण्यात आली. या … Read more

मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या सभासदानां भेटवस्तूंचे वाटप

मुरगूड ( शशी दरेकर ) :मुरगूड व मुरगूड परिसरातील सर्वांच्या परिचीत असणाऱ्या श्री . गणेश नागरी सह . पतसंस्थेच्या वतीने दिपावली निमित्य ५ लिटर -खाद्यतेल , वाटप व १५ टक्के डिव्हीडड वाटप संस्थेचे सभापती श्री .एकनाथ शं . पोतदार व संस्थापक श्री , उदयकुमार छ . शहा यांच्या शुभहस्ते या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले,मुरगूडची श्री. … Read more

चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचा आनंद मोठा – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे उद्गार

कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा सत्कार सोहळा उत्साहात कागल : आयुष्याच्या सुरुवातीलाच हृदयरोगासह दुर्धर आजाराने ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच लोपलेले असते. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचे स्वास्थ्य हरवते. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या या चिमुकल्यांच्या चेहर्‍यावरील हास्याचा मनाला मोठा आनंद आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. छोट्या-छोट्या चिमुकल्यांच्या रोगमुक्तीच्या या सेवेचे फार … Read more

error: Content is protected !!