मुरगूड मधून ५८ वर्षीय शेतकरी बेपत्ता

मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूड, ता. कागल: येथील श्रीराम मंगल कार्यालयातून २ जुलै २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास बाळासो शिवाप्पा लोंढे (वय ५८, रा. सोनगे, ता. कागल, जि. कोल्हापूर) हे बेपत्ता झाले आहेत. याबाबत त्यांचा मुलगा अमोल बाळासो लोंढे (वय ३४, धंदा-फेब्रिकेशन, रा. सोनगे यांनी मुरगूड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाळासो लोंढे … Read more

Advertisements

निधन वार्ता : मधुकर दत्तात्रय अर्जुने

मुरगूड येथील सेवानिवृत एसटी कर्मचारी मधुकर दत्तात्रय अर्जुने (वय ७२ ) यांचे ऱ्हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई ‘ पत्नी मुलगा नातू दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि ७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

CUET UG निकाल 2025: कधी आणि कुठे डाउनलोड करायचा

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केल्यानुसार, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG) 2025 चा निकाल आज, 4 जुलै 2025 रोजी जाहीर होणार आहे. निकालाची वेळ निश्चित झालेली नसली तरी, उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट्सवर लक्ष ठेवून राहू शकतात. कुठे डाउनलोड करायचा निकाल: एकदा निकाल जाहीर झाल्यावर, उमेदवार खालील अधिकृत वेबसाइट्सवरून तो डाउनलोड करू शकतील: … Read more

NCC प्रशिक्षण शिबिरासाठी दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

कोल्हापूर, : ५६ महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेना पथक (NCC), कोल्हापूर कार्यालयामार्फत सप्टेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत एन. सी. सी. भवन, शिवाजी विद्यापीठ आवार, कोल्हापूर येथे विविध वार्षिक प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमधील सहभागींसाठी प्रतिदिन न्याहारी, सकाळी चहा-बिस्किट, दुपारचे जेवण, सायंकाळचा चहा-बिस्किट आणि रात्रीचे जेवण, अशा शिबिर अन्नश्रेणीनुसार (मेनू) अन्नपुरवठा करण्यासाठी (प्रति व्यक्ती … Read more

शेतकऱ्यांच्या मृत्यू, देयक विलंबावरून महाराष्ट्र विधानसभेत गदारोळ; विरोधकांचा सभात्याग

मुंबई, ३ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी (२ जुलै २०२५) शेतकरी आत्महत्या, सरकारी खरेदी केलेल्या सोयाबीनचे थकीत देयक आणि इतर शेतकरी संबंधित मुद्द्यांवरून प्रचंड गाजले. विरोधकांनी सरकारवर असंवेदनशीलतेचा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा टाळल्याचा आरोप करत दोनदा सभात्याग केला. विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर रणकंदन! 🚜🌾 काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या गंभीर मुद्द्यांवर चर्चा … Read more

कापशी मधील नराधम शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी मुरगुड मधील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

मुरगूड ( शशी दरेकर ) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेमध्ये निसार अहमद महोद्दीन मुल्ला या नराधम शिक्षकाने शाळेमधील एका निरागस विद्यार्थिनींची छेडछाड केली. या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगूड हिंदुत्ववादी संघटना व शिवभक्त यांच्या वतीने मुरगूड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. मुरगुडचे एपीआय शिवाजी करे यांनी नागरिकांची मागणी कळवून आरोपीला … Read more

विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन करणाऱ्या शिक्षकाला पालकांकडून चोप

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील रानडे विद्यालयातील सहाय्यक शिक्षकाने विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन केले. हा प्रकार सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. पालकांनी शाळेत जाऊन त्या शिक्षकास बेदम चोप दिला. निसारीअहमद मोहीदिन मुल्ला, रा. कापशी तालुका कागल असे त्या नराधम शिक्षकाचे नाव आहे. त्या शिक्षकास अटक करून पोलिसांनी त्याच्या मुस्क्या आवळल्या आहेत. कापशी … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक ४२ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ४२ दिनांक ३०-०६-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन सुरू

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन पारंपारिक गीतांनी सुरू झाले, त्यानंतर मंत्र्यांची ओळख झाली. नगरपरिषदा, नगर पंचायती, औद्योगिक वसाहती आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाशी संबंधित सुधारणांसह अनेक प्रमुख अध्यादेश मांडण्यात आले. २०२५-२६ च्या पूरक मागण्या मांडण्यात आल्या, त्यावर ७ आणि ८ जुलै रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे. जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, मोटार … Read more

कोल्हापूर विमानतळावर यशस्वी आपत्कालीन मॉकड्रिल

आगीवर नियंत्रण, जखमींना मदत आणि प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची चाचणी यशस्वी गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : अलाहाबाद येथे नुकत्याच झालेल्या विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विमानतळांवर सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन तयारीचा आढावा घेतला जात असताना, कोल्हापूर विमानतळावर रविवारी (येथील माहितीनुसार) आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या क्षमतेचे मॉकड्रिल यशस्वीपणे पार पडले. यात आगीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना मदत करणे … Read more

error: Content is protected !!