वाचा गहिनीनाथ समाचार अंक ५० ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक ५० दिनांक १८-०८-२०२५ रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २६ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २२ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या … Read more

Advertisements

मुरगूड मध्ये विविध ठिकाणी ७९ वा ध्वजारोहण समारंभ संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड शहरातील विविध ठिकाणी ध्वजारोहण समारंभ अत्यंत दिमाखदारपणे  पार पडला. हुतात्मा तुकाराम चौकातील मुख्य ध्वजारोहण मुरगूड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आतिश वाळुंज यांच्या हस्ते करण्यात आले. या समारंभाला शहरातील  मान्यवर, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, प्रशासकीय सेवक वृंद  त्याच  प्रमाणे अबालवृद्ध  उपस्थित होते. हुतात्मा स्मारकातील ध्वजारोहण स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार राणोजी गोधडे, … Read more

पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे येथे देशभक्तीच्या वातावरणात ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा!

पी.एम. श्री केन्द्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे – ०७ येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन दिनांक १५ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या परिसराची पताका आणि फुग्यांनी सुंदर सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात अभिमान आणि आनंदाची भावना पसरली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.00 वाजता झाली. विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर शाळेच्या प्रांगणात … Read more

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी आधार संलग्न बँक खात्याची सक्ती

महाडिबीटीवरील प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे आवाहन कोल्हापूर, दि. १४ (जिमाका): अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध शैक्षणिक सुविधा व सवलती पुरवल्या जातात. यातीलच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे केंद्र पुरस्कृत भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट शिष्यवृत्ती जमा होण्यासाठी बँक खाते आधारशी संलग्न … Read more

मुरगूडच्या श्री गणेश नागरी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरवलेली व सर्वपरिचीत म्हणूण ओळख असलेली  श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २४/०८/२०२५ रोजी दुपारी ठिक १ वाजता मुरगूडच्या साई आखाडा हॉल येथे सपन्न होणार आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदाना काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि . … Read more

मुरगूड नगरपरिषदेतर्फै ” हर घर तिरंगा ” मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद

मुरगूड ( शशी दरेकर ) : केंद्र सरकारच्या ” स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमिवर २ ऑगस्ट ते १५ ऑगष्ट २०२५या कालावधीत “हर घर तिरंगा” ही जनजागृती मोहीम संपूर्ण देशभर राबवली जात आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमिवर एक भाग म्हणून दिनांक १३ ऑगस्ट२०२५ रोजी मुरगूड नगरपरिषद यांच्या वतीने मुरगूड शहारामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर … Read more

हुल्लडबाजी व डॉल्बीचा दणदणाट याऐवजी तरुण मंडळी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे – डी. वाय. एस .पी. सुजित क्षीरसागर

कागल (प्रतिनिधी) : डॉल्बीचा दणदणात नको, हुल्लडबाजी नको, महिलांची छेडछाड नको, मद्यप्राशन नको, पिचकारी नको असे सांगत तरुण मंडळांनी सामाजिक व विधायक कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन कोल्हापूरचे करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी कागल येथे बोलताना केले.         होऊ घातलेल्या गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते कागल येथे बोलत होते .कागल पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या 28 … Read more

निधन वार्ता – शांताबाई रणवरे

मुरगूड ता. कागल (भोई गत्ली) येथील श्रीमती शांताबाई अनंत रणवरे (वय ७७) यांचे बुधवार दि .१३ / ८ / २०२५ रोजी पहाटे चार वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  माजी नगरसेवक सुनिल रणवरे ( सर ) तसेच न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली ता. कागल शाळेचे कलाशिक्षक मोहन रणवरे तर मुरगूड नगरपरिषदेचे वरिष्ठ लिपिक विनायक रणवरे यांच्या … Read more

मुरगूड नगरपरिषदेची प्लास्टिकविरोधी मोहीम, ११,९०० रुपयांचा दंड वसूल

मुरगूड (शशी दरेकर) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमान अभियानांतर्गत मुरगूड नगर परिषदेने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवून ११,९०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही मोहीम मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. या मोहिमेत शहरातील दुकाने, हॉटेल्स, हातगाड्या आणि खाद्यगाड्यांची अचानक तपासणी करून बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. या मोहिमेमुळे शहरात प्लास्टिकचा वापर कमी होईल, अशी … Read more

निधन वार्ता – ईश्वरा खराडे

शिंदेवाडी गावचे प्रतिष्ठित नागरिक ह .भ.प . ईश्वरा दत्तु खराडे रा. शिंदेवाडी ता. कागल यांचे मंगळवार दि. १२/०८/२०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि. १३/०८/२०२५ रोजी सकाळी ९ वा  वैकुंठ स्मशानभूमी शिंदेवाडी येथे आहे.

error: Content is protected !!