लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मृतीदिनानिमित्य जेष्ठ नागरिक संघात अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात पुरोगामी तत्त्वज्ञान अखेरच्या श्वासापर्यंत जपणारे … लोककल्यानाचा ध्यास घेऊन सतत कार्यरत राहिलेले … स्वच्छ चरित्र आणि चारित्र या बळावर कोल्हापूर जिल्हयाच्या राजकारण व समाजकारणावर आपल्या कर्तुत्वरुपी नेतृत्वाचा ठसा उमटविणारे लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्य श्री. … Read more

सदाशिवराव मंडलिक संस्कार भवनमध्ये चिमुकल्यानीं भरवला आठवडी बाजार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन आयोजित शनिवार दिनांक 9 मार्च 2024 रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा आठवडी बाजार हा उपक्रम घेण्यात आला .विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक ज्ञानात भर पडावी , पैशाची देवाण – घेवाण कळावी यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या शेतातील भाजीपाला किंवा इतर वस्तू, घरात करण्यात आलेले खाद्यपदार्थ, किराणा, स्टेशनरी … Read more

वेगाने बदलणाऱ्या जागतीक परिस्थितीमध्ये बहुविद्याशाखीय  कौशल्ययुक्त युवापिढी निर्माण होण्याची आवश्यकता – प्र कुलगुरू डॉ पी एस पाटील

मुरगूड ( शशी दरेकर ) – वेगाने बदलणाऱ्या जागतीक परिस्थितीमध्ये बहुविद्याशाखीय कौशल्ययुक्त युवापिढी निर्माण होण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ पी एस पाटील यांनी बीजभाषक   म्हणून  बोलतांना व्यक्त केले. येथील सदाशिवराव मंडलिक महाविदयालयात एक दिवशीय  बहुविद्याशाखीय राष्ट्रिय परिषद आयोजित केली होती यावेळी ” अभ्यासक्रमाव्दारे कौशल्यवृद्धी एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन ”  या विषयावर    ते बोलत होते. … Read more

मुरगूडच्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचा अप्रतिम महाशिवरात्र उत्सव मंगलमय वातावरणात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथील ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयाचा महाशिवरात्रोत्सव उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला. नारळां पासून बनवलेले सोळा फूट उंचीचे शिवलिंग व नंदी यांचा देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. चिमगांव चे अनिल अंगज भाई व मुरगूड चे राजू भाई या कलावंतांनी यासाठी दोन दिवस अविश्रांत परिश्रम घेतले.देखावा पहाण्या करिता पंचक्रोशीतील भाविक … Read more

शिवगड ट्रस्टचा १० वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड-येथील शिवगड अध्यात्म चॅरीटेबल ट्रस्ट, या संस्थेचा दहावा वर्धापन दिन शनिवार दिनांक २ मार्च २०२४ रोजी राजे समरजीतसिंहजी घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.          दहा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय प्रवचनकार.पू.डॉ. श्रीकृष्ण देशमुख तथा डॉक्टर काका यांच्यासंकल्पनेतून  आणि स्व.  विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या ट्रस्ट तर्फे अद्वैतत्वज्ञानाचा , संत … Read more

वाचा गहिनीनाथ समाचार अंक २५ ऑनलाईन

गहिनीनाथ समाचार अंक २५ दिनांक ०४-०३-२०२४ गहिनीनाथ समाचार गेली २४ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २० वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया … Read more

लेखक चंद्रकांत माळवदे यांचा शिवगड ट्रस्ट तर्फे सत्कार

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड-येथील ‘शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्ट’,च्या वतीने ‘गोवऱ्या आणि फुले ‘ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखक श्री चंद्रकांत माळवदे (सर ) यांचा, त्यांच्या पुस्तकास गारगोटी येथील ‘अक्षरसागर साहित्य मंच’तर्फे उत्कृष्ट साहित्यकृती म्हणून पुरस्कार प्राप्त झाला, म्हणून ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष यथोचित सत्कार शुक्रवार  (१ मार्च २०२४) रोजी ‘शिवगड ट्रस्ट’ च्या सभागृहामध्ये संपन्न झाला. … Read more

मुरगूडला म्हाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची जय्यत तयारी – यात्रा कमिटीची माहिती

मुरगूड ( शशी दरेकर ) :  सुमारे पंधरा ते सोळा वर्षानंतर मुरगूडची म्हाई २ मार्चला जोरदार होत आहे.या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीने सर्व पातळीवर तयारी केली असून बाहेर गावाहून येणाऱ्या पै – पाहुणे, मित्रमंडळींना अंबाबाईचे देवदर्शन सुलभ पध्दतीने व्हावे. त्याचबरोबर शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जय्यत तयारी केली असल्याची माहिती यात्रा कमिटीने पत्रकार परिषदेत दिली. येथील ग्रामदैवत … Read more

शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक

श्री. सम्राट सणगर शासन पुरस्कृत गुंडशाही लोकशाहीला धोकादायक उल्हासनगर पोलीस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कल्याण शहर शिवसेनाप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशन मध्येच रिवाल्वर मधून गोळ्या झाडल्या. तसेच आमदार गायकवाड यांच्या अंगरक्षकांनी महेश गायकवाड यांच्या सहकारी शिवसैनिक राहुल पाटील यांचेवर चार गोळ्या झाडल्या. हा गोळीबाराचा प्रकार … Read more

कॉ. पानसरे नी प्रतिगाम्यांशी टोकाचा संघर्ष केला

20 फेब्रुवारी 2015 रोजी महाराष्ट्रातील थोर विचारवंत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचा मृत्यू झाला. कॉ. पानसरे व त्यांच्या पत्नीवर सकाळी फिरावयास गेल्यावर 16 फेब्रुवारी 2015 रोजी खुनी हल्ला झाला. चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. सारे कोल्हापूर शहर आणि महाराष्ट्र हादरला. त्यांच्या स्मारकाचे नुकतेच कोल्हापुरात उद्घाटन झाले. ज्या दिवशी कॉम्रेड पानसरे यांच्यावर … Read more

error: Content is protected !!