कागलच्या सामाजिक कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय पाऊल: दिव्यांचे अंधार दूर करण्यासाठी फराळाची मोहीम

कागल (सलीम शेख): कागल तालुक्यातील काही सामाजिक कार्यकर्ते ग्रामीण भागातील दारिद्र्य आणि विकासाच्या अभावाला नजरेआड करत नाहीत. त्यांनी या दिव्याळी उत्सवाला एक वेगळे रूप दिले आहे. तालुक्यातील अनेक खेडे, वाड्या, वस्त्यांमध्ये अजूनही मूलभूत सुविधा जसे की वीज आणि रस्ते उपलब्ध नाहीत. यामुळे येथील रहिवासी दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करतात. या पार्श्वभूमीवर, या सामाजिक कार्यकर्त्यांनी … Read more

जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका – पी. जी. केणे

मडिलगे (जोतीराम पोवार) : समोरच्या व्यक्तीला कधीही कमी न लेखता जीवनात तत्त्वाशी कधीही तडजोड करू नका असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक पी.जी.केणे यांनी केले ते 28 वर्षानंतर एकत्र जमलेल्या वाघापूर हायस्कूलच्या 1995 ..96 सालच्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मार्गदर्शक शिक्षकांचा मानपत्र सत्कार सोहळा व स्नेह मेळावा आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गुरुवर्य म्हणून बोलत होते. प्रारंभी पी जी … Read more

युवा उद्योजक ओंकार घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

सुळकूड (सुरेश डोणे) : सुळकूड (ता.कागल) येथील युवा उद्योजक ओंकार सदाशिव घाटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी दिपावली निमित्त सुळकूड मधील सर्व ग्रामस्थांना घाटे उद्योग समूहाच्या वतीने भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. युवा उद्योजक ओंकार घाटे यांची पुणे शहरात घाटे कन्स्ट्रक्शन या नावाने बांधकाम क्षेत्रामध्ये वेगळी ओळख आहे. बांधकाम क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय … Read more

कुरणी बंधाराऱ्यावरची वाहतूक धोकादायक

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड जवळील वेदगंगा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आता जीर्ण होत आला आहे. बंधाऱ्यावर दोन्ही बाजूस असलेले कठडा खांब एकेक करून ढासळत आहेत.त्यामुळे वाहतुकीस हा बंधारा धोकादायक बनला आहे.     खालून पाण्याचा वाहता प्रवाह आहे.पुलावरून शाळेची मुले पायी, सायकल किंवा दुचाकीवरून जातात. वडाप व अवजड वाहनांची पण वाहतूक सुध्दा सुरू असते.तुटलेल्या खांबामुळे  … Read more

कागलला गडकिल्ल्यांच्या प्रतिकृती

कागल (सलीम शेख): दिवाळी आणि गैबी उरुस या सणांच्या निमित्त कागल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले यांच्या प्रतिकृतींचे अद्भुत प्रदर्शन भरले आहे. शहरातील प्रत्येक चौक आणि गल्लीमध्ये लहान-मोठे मुले आपल्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा अद्भुत नमुना मांडत गडकिल्ले उभारत आहेत. या वर्षीच्या प्रदर्शनात गडकिल्ले बांधणीच्या बाबतीत एक नवीनच उंची गाठली आहे. किल्ल्यांची हुबेहू प्रतिकृती, त्यांची आकर्षक … Read more

कागल गहिनीनाथ गैबी उरुसात भक्तीचा महासागर

कागल(सलीम शेख): कागल येथील ग्रामदैवत हजरत श्री गहिनीनाथ गैबी पीर उरुस रविवारी भाऊबीजच्या शुभ मुहूर्तावर भव्यदिव्यरीत्या सुरू झाला. यात्रास्थळी भाविकांची मोठी गर्दी उमटली. पहिल्या दिवशी झालेल्या गलेफाच्या कार्यक्रमात हजारो भक्त उपस्थित होते. सोमवार, मंगळवार आणि बुधवारी, गुरूवारी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा गलेफ,पाचवा गलेफ पार पडला. या प्रत्येक दिवशी भक्तीभावाने भक्त दर्गेत दाखल होत … Read more

error: Content is protected !!