निधन वार्ता : श्रीमती हौसाबाई मारुती भूते

मुरगूड :मुरगूड येथील श्रीराम मंगल कार्यालय व भूते बंधू मंडप डेकोरेशनचे मालक रामचंद्र व विठ्ठल भूते यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई मारुती भूते (वय ८३ ) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सूना व नातवंडे असा परिवार आहे . रक्षाविसर्जन शुक्रवार दि. २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता मुरगूड येथे आहे.

Advertisements

कागल तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

कागल / प्रतिनिधी : कागल तालुक्यातील 83 ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर करणेत आले. तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी हे आरक्षण जाहीर केले. जाहीर केलेली आरक्षण सोडत ही सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी आहे.           कागल तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी सरपंच पदाची निवडणूक लढविण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. पण आरक्षण ऐकताच काही ठिकाणी खुशी तर … Read more

कसबा सांगाव येथील रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात नागरिकांचे झाडे लावून अभिनव आंदोलन

कागल : कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे संतप्त नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात अनोखे आणि प्रतीकात्मक आंदोलन केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आणि यामुळे नागरिकांना होणारा त्रास अधोरेखित करण्यासाठी, आंदोलकांनी चक्क रस्त्यातील खड्ड्यांमध्ये झाडे लावून आपला निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यांपासून कसबा सांगाव येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचारी … Read more

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मुरगूड नगरपरिषदेचा पुन्हा एकदा रोवला झेंडा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ कचरा मुक्त शहर मानांकन व हागणदारी मुक्त शहरामध्ये मुरगूड नगरपरिषदेने उच्चतम कामगिरी करुन देशात २०३५ शहरांपैकी २६ वा व २० हजार पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटा मध्ये राज्यात १६३ शहरांपैकी ४ था क्रमांक पटकावुन आपल्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये योगदान अभादित केले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ २५ मार्च ते … Read more

बदल स्वीकारून माध्यमांचे महत्त्व वृद्धिंगत करूया… कोल्हापूरच्या पत्रकार कार्यशाळेतील ‘सकारात्मक’ सूर

कोल्हापूर : माध्यमांच्या बदलत्या स्वरूपाला सामोरे जाण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व अधिक ठसठशीत करण्यासाठी नव्या बदलांचा स्वीकार करणे अत्यावश्यक आहे, यावर कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार कार्यशाळेत एकमत झाले. “बदल स्वीकारून माध्यमांचे महत्त्व वृद्धिंगत करूया,” असा सकारात्मक सूर या कार्यशाळेत उमटला. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयातर्फे आयोजित या पहिल्या टप्प्यातील कार्यशाळेत शासनमान्य दैनिके व … Read more

Air India flight crash pilot अहमदाबाद विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या भूमिकेशी संबंधित अहवाल भारताने फेटाळला

अहमदाबाद: गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या भीषण विमान अपघाताबाबत वैमानिकांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा दावा करणारा अहवाल भारताने फेटाळून लावला आहे. विमान अपघात अन्वेषण विभागाने (AAIB) याबाबत स्पष्टीकरण दिले असून, Air India flight crash pilot वैमानिकांवर दोषारोप करणारे दावे निराधार असल्याचे म्हटले आहे. १२ जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग ७८७-८ … Read more

कोल्हापुरात ‘100 दिवस 100 शाळा’ रस्ता सुरक्षा उपक्रमाला व्यापक यश

परिवहन विभाग व शाळा प्रशासनाचा सक्रिय सहभाग कोल्हापूर, दि. 17 : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘100 दिवस 100 शाळा’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती मोहीम जोमाने सुरू आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांच्या समन्वयाने ही मोहीम राबविली जात आहे. यात हेल्मेटचा वापर, रस्ता चिन्हे, अपघातग्रस्तांना मदत, पादचारी व सायकलस्वार … Read more

जप्त स्थावर मालमत्तेचा जाहीर लिलाव सूचना

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी क्र. 3 इचलकरंजी कोर्ट यांच्या आदेशानुसार, श्री. दिलीप अर्जुना काजळे, रा. 17/ब, ई वॉर्ड, 1 ली गल्ली, विक्रमनगर, ता. करवीर, जि. कोल्हापूर यांच्याकडून एकूण रक्कम रु. 17,19,572/- (रक्कम रुपये सतरा लाख एकोणीस हजार पाचशे बहात्तर फक्त) इतकी रक्कम वसूल करण्याकरिता त्यांची मौजे उंचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील … Read more

कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ मध्ये १२ वा क्रमांक

नागरिकांच्या सहकार्याने यश कागल (प्रतिनिधी): कागल नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत २० हजार ते ५० हजार लोकसंख्येच्या गटात देशातील १५८५ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये १२ वा क्रमांक पटकावून ३ स्टार दर्जा आणि Odf++ मानांकन प्राप्त झाले आहे. या यशाचे श्रेय मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. अजय पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील शहराला मिळाले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमध्ये शहरातील … Read more

मुरगूड नगरपरिषदमध्ये ” नमस्ते दिन ” उत्साहात साजरा

मुरगूड ( शशी दरेकर ) : स्वच्छ भारत नागरी अभियान २.० अंतर्गत नॅशनल अॅक्शन फॉर मेकॅनाइज्ड गॅनिटेशन इकोसिस्टीम योजनेच्या अनुषंगाने १६ जुलैला “नमस्ते दिन” साजरा केला जातो. या दिनानिमित्त सफाई कर्मचा-यांची सुरक्षा व प्रतिष्ठा सुनिश्चित केली जाते. मुरगूड मुख्याधिकारी अतिश वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी नमस्ते दिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचा-यांना सुरक्षेच्या उपकरणांचे … Read more

error: Content is protected !!