मुरगूड केंद्रावर नवोदय प्रवेश परीक्षा सुरळीत

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगुड तालुका कागल येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड या केंद्रावर जवाहर नवोदय विद्यालय साठी असणारी प्रवेश परीक्षा सुरळीत पार पडली. प्रविष्ट ३६० विद्यार्थ्यापैकी ३५३ विद्यार्थी प्रत्यक्ष हजर होते ७ विद्यार्थी गैरहजर राहिले. या केंद्रावर केंद्रीय निरीक्षक म्हणून धनाजी सातपुते यांनी तर केंद्र संचालक म्हणून प्राचार्य एस. पी. पाटील यांनी … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कामाचा लेखाजोखा : आठ महिन्यात ६० सिझेरियनसह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया

मुरगूड ( शशी दरेकर )       येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर अखेरच्या आठ महिन्यात विविध सेवा देण्यात आल्या. त्यापैकी नोव्हेंबर २०२५ अखेर सिझेरियनद्वारे ६० प्रसूती (बाळंतपण) सह २४९ मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र कांबळे यांनी बोलताना दिली.          फेब्रुवारी २०२५ पासून येथे महात्मा ज्योतिबा फुले जन … Read more

हुतात्मा दिन पूर्वसंध्येला  दीपोत्सवाने हुतात्म्यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ): हुतात्मा दिन पूर्वसंध्येला मुरगुड ता. कागल येथील हुतात्मा तुकाराम भारमल या ऐतिहासिक चौकात दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांच्या हस्ते या दीपोत्सवाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी प्रा. डी डी चौगुले, ए पीआय शिवाजीराव करे, जयवंत हावळ, समाधान सोनाळकर यांनी याप्रसंगी आपल्या … Read more

बोरवडे येथून अज्ञात चोरट्या कडून २ लाख ५ हजार किंमतीचा ऐवज लंपास.

मुरगूड ( शशी दरेकर ): बोरवडे  तालूका कागल पैकी अज्ञातदत्तनगर  कुंभारवाडा येथील बंद घरचा कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्याने २ लाख ५ हजार  रुपयाचे  सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना काल घडली . घटनेची नोंद मुरगूड पोलीस ठाण्यात झाली आहे.         या बाबतची हकीकत अशी की प्रतिक प्रकाश बोटे वय ३४ वर्षे धंदा शेती व होलसेल … Read more

मुरगुड येथे अमेरिकन पाहुण्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

मुरगुड येथील ऑफिस, सायलेज कारखान्याला दिली भेट मुरगूड ( शशी दरेकर ) एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड अमेरिकेतील संस्थेने बायफ व गोकुळ दूध संघाच्या मदतीने शिंदेवाडी येथील गौअग्रीदेटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीला गेले वर्षभर वेगवेगळ्या योजनेतून चारा निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या मुरगुड येथील ऑफिस, सायलेज कारखान्याला आज भेट दिली. शास्त्रज्ञांच्या या … Read more

राज्याच्या परिवहन मंत्र्यांची नागरिकांसाठी तक्रार निवारण वेबसाईट

मुरगूड ( शशी दरेकर ) : महाराट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यापूर्वी विद्यार्थ्यांकरीता  हेल्पलाइन क्रमांक दिला आहे.  त्याबाबत महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद ही मिळाला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत परिवहन खात्याशी संबंधित असलेल्या राज्यातील सर्व नागरिकांच्या करीता  www.pratapsarnaik.com या वेबसाईटवर सुविधा (Subscribe) व तक्रार निवारण (Grievances) या दोन्ही सोयी उपलब्ध परिवहन खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या आर टी … Read more

मुरगूड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव पाटील यांचे दुःखद निधन

मुरगूड ( प्रतिनिधी ) : मुरगूड नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शंकरराव महादेव पाटील   ( वय ८५ )  (अण्णा)  यमगेकर  यांचे वृद्धापकाळाने  दुःखद निधन झाले. कसदार व्यायामाने कमविलेली पिळदार देहयष्टी, रांगडा पण पहाडी आवाज, गोरगरीब जनतेशी  सदैव नाळ जोडलेली  त्यामुळे अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व  होते. महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे ते खंदे कार्यकर्ते होते.त्यांच्या मागे एक … Read more

गणपती कमळकर यांची सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून कोल्हापूर येथे बदली

मुरगूड ( शशी दरेकर ) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांची कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून बदली झाली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंबंधीचे आदेश काढले आहेत. डॉ. गणपती कमळकर यांनी यापूर्वी कागल येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करून आपल्या शैक्षणिक कार्याचा … Read more

श्री. व्यापारी नागरी मुदाळ तिट्टा शाखेचा २०वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल श्री. व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुदाळतिट्टा शाखेचा २० वा वर्धापनदिन मोठया उत्साहाच्या वातावरणात सपन्न झाला. सोमवार दि. ८/१२/२०२५ इ. रोजी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्य सकाळी ८.३५ वाजता सौ. व श्री. संदीप द. कांबळे यांच्या शुभहस्ते श्री. सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्यापारी नागरी पतसंस्थेचे चेअरमन किरण गवाणकर, … Read more

मुरगूडमध्ये समाजवादी प्रबोधिनीतर्फै डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल समाजवादी प्रबोधनीतर्फे ६ डिसेंबर रोजी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यानां महापरिवर्तन दिनानिमित्य विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी सुरेश साळुंखे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पणे करण्यात आला.या अभिवादन प्रसंगी दलितांवरील अन्यायाला वाचा फोडणे व इतर त्यांच्या कार्याविषयी उपस्थितानी मनोगते व्यक्त केली. यावेळी कॉ. … Read more

error: Content is protected !!