G1 G2
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात येणारे टी.ई.टी. (शिक्षक पात्रता परिक्षा) परिक्षा पुर्वीच पेपर फुटीचा प्रयत्न करणारे रॅकेट उघडकीस.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे, प्रींटर, मोबाईल, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकूण 16,00,000/-रु चा मुद्देमाल जप्त, एकूण 07 आरोपी अटक व 10 संशयीत ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मुरगूड पोलीस ठाणेची सयुंक्तीक कारवाई. महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करणेपुर्वी त्यांनी त्यांचे डी.एड., बी.एड. शिक्षणासह टी.ई.टी. परिक्षा (शिक्षक पात्रता परिक्षा) उत्तीर्ण असणे अनिवार्य केले असलेने … Read more
वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल मध्ये इंडक्शन, ओरिएंटेशन व फ्रेशर्स पार्टी उत्साहात संपन्न
कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वाय. डी. माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, कागल येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत इंडक्शन, ओरिएंटेशन आणि फ्रेशर्स पार्टीच्या उत्साही कार्यक्रमांनी करण्यात आले. महाविद्यालयात प्रथम वर्षात प्रवेशित B. Pharm, Direct Second Year आणि D. Pharm विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विशेषतः आयोजित करण्यात आला. पालकांची उत्स्फूर्त उपस्थिती ही कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली. 👉कार्यक्रमास कॅम्पस डायरेक्टर … Read more
टी इ टी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद
स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगूड पोलिसांची संयुक्त कामगिरी नऊ जण पोलिसांच्या ताब्यात मुरगूड ( शशी दरेकर ): आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक ( TET )पात्रता परीक्षा सुरू आहे पण या परीक्षेचा पेपर फोडण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून मुरगुड पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. सदरच्या टोळीची व्याप्ती फार … Read more
मुरगूडची एकहाती सत्ता द्या शहराचा स्वर्ग बनवतो – मंत्री हसन मुश्रीफ
मुरगूडमध्ये प्रचाराचा नारळ फुटला. मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगूड मध्ये एकहाती मुश्रीफ गटाची आतापर्यंत सत्ता कधीच आली नाही त्यामुळे विकासनिधी देताना मर्यादा येत होत्या. या निवडणुकीत शहर विकासासाठी आमच्या सर्व २१ जागा विजयी करा मुरगूडला स्वर्ग केल्याशिवाय राहाणार नाही असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. ते मुरगूड येथे राष्ट्रवादी व छ. शाहू … Read more
सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘क्रिडा महोत्सवाचा’ उत्साहपूर्ण उद्घाटन सोहळा संपन्न! 🏃♀️
गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) : सौ. अंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, गोकुळ शिरगाव येथे शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘क्रिडा महोत्सवाचा’ उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील (५ मराठा बटालियन, एन.सी.सी. ऑफिसर, कोल्हापूर), विलास पाटील सर (सेवानिवृत्त उप-प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, पलूस) … Read more
निधन वार्ता – श्रीमती पार्वतीबाई मेतकेकर
मुरगूड ता. कागल येथिल श्रीमती पार्वतीबाई दतात्रय मेतकेकर ( वय १०७ ) यांचे शनिवार दि. २२ / ११ / २०२५ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. जुन्या काळातील त्यांचे व्यक्तीमत्व व मनमिनावू स्वभाव यामुळे त्या परिसरात परिचीत होत्या.त्यांच्या पश्चात मुले, मुली, सूना, नातवंडे असा परिवार आहे .रक्षा विसर्जन रविवार दि.२३ / ११ / २०२५ रोजी सकाळी … Read more
मुरगूडमध्ये शार्टसर्किटमुळे उसाला आग
मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड तिट्टा रोडवरील दावत हॉटेल समोरील उसाच्या शेतामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. शेतकऱ्यांची तप्तरता व नागरीकांच्या सहकार्याने आग लागलेल्या उसाच्या भोवतालचे ऊस कापून पुढे जाणाऱ्या आगीची वाट बंद करण्यास सुरुवात केली याच दरम्यान सदाशिवराव मंडलिक कारखाना व बिद्री कारखान्याचे बंब वेळेत आल्याने आग आटोक्यात येऊन शेकडो एकर … Read more
नवनिर्वाचित सरपंच “आशाराणी कांबळे” यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
मुरगूड ( शशी दरेकर ): कागल तालुका लोककल्याण समता प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने गोरंबे येथे नुकतेच नवनिर्वाचित सरपंच आयुष्यमती आशाराणी निशिकांत कांबळे यांचा भव्य सत्कार सोहळा स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजहित, गावविकासाची बांधिलकी आणि तरुण नेतृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आशाराणी ताईंना शाल, पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन … Read more
मुरगूड नगरपालीकेत नगराध्यक्ष पदासाठीचे नऊ तर नगरसेवक पदासाठीचे ११६ अर्ज अपात्र
सुहासिनी पाटील तसमीन जमादार व सुजाता अर्जुने यांचे नगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैद्य. मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगूड नगरपालीकेच्या नगराध्यक्ष पदासाठी एकूण १२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ९ उमेदवारी अर्ज अपात्र झाले. तर नगरसेवक पदासाठी २०६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ११६ अर्ज अपात्र झाले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी तीन … Read more