कागल मध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूर च्या यशानंतर तिरंगा यात्रेचे आयोजन

व्हनाळी : देशभरात ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर ठिकठिकाणी भारतीय बांधव आणि विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढून सैनिकांच्या धैर्याला सलाम करण्यात आला.  भारतीय सशस्त्र दलांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या सन्मानार्थ कागल येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.  या यात्रेंमध्ये माजी सैनिक, विविध मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  कागल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज … Read more

Advertisements

कागलमध्ये राष्ट्रीय डेंग्यू दिन उत्साहात संपन्न

कागल (सलीम शेख) : दि. १६ मे  राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त कागल शहरात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालय, कागल येथे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे रुग्णालयात उपस्थित नागरिक आणि रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया आणि हिवताप या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी या आजारांची कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाय यावर मार्गदर्शन करण्यात आले. … Read more

अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी, निष्ठापूर्वक जीवनरूपी पुष्प अर्पण करणे महत्त्वाचे: परमात्मराज महाराज

आडी(राजू पाटील): आडी (ता. निपाणी) येथे श्री दत्त समर्चन समारोहात भाविकांचा उदंड प्रतिसाद, अर्चन भक्ती ही सर्वांसाठी सोपी आहे. त्यामुळे निष्ठा ठेवून जीवनरूपी पुष्प संपूर्णत्वाने अर्पण करणे आवश्यक आहे. तेंव्हाच माणसाचा उध्दार होतो. अध्यात्मधन सर्वांसाठी आहे. केवळ भौतिक धन महत्वाचे नाही. पुण्यरूपी धन, ज्ञानधन, विविध सद्गुणरूपी धन मिळवून आध्यात्मिक वाटचाल करावी, हा विश्वावसु संवत्सराचा संदेश आहे, … Read more

मुरगुड विद्यालयाच्या वाणिज्य विभागाची दीपिका लुगडे कागल तालुक्यात प्रथम

विज्ञान विभागाची दिव्या गुरव, व कला विभागाची शांती कांबळे मुरगुड केंद्रात द्वितीय मुरगूड ( शशी दरेकर ):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड चा बारावीचा एकूण निकाल ९५. ४८ टक्के इतका विक्रमी लागला आहे. कॉमर्स विभागाची दीपिका दयानंद लुगडे हिने ९१.६७ … Read more

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ. शिवाजी होडगे यांची निवड

मुरगूड ( शशी दरेकर) : मुरगूड येथील सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी  प्रा डॉ.शिवाजी होडगे यांची निवड झाली. डॉ.शिवाजी होडगे यांनी याच  महाविद्यालयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून ३४ वर्ष सेवा केली असून त्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  जर्नल मध्ये ३० शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.तीन ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. शिवाजी विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य …पीएच .डी … Read more

मुरगुडच्या मैदानात शुभम सिद्धनाळ ठरतोय हॉटस्पॉट; प्रदेशात दुसऱ्या दिवशी बाल मल्लांनी गाजवले मैदान

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथील “नामदार चषक” राज्यस्तरीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात शुभम सिद्धनाळे याने गणेश कुरकुमे याला नमवून पुढील फेरीत प्रवेश केला. 52 किलो गटात अतिशय चुरशीच्या सामन्यात बेलेच्या माऊली टिपूगडे याने राशिवडेच्या किशोर पाटील याला आपल्या आक्रमक खेळीने पराभूत करत पुढील फेरीत दिमाखात प्रवेश केला. वैद्यकीय शिक्षण … Read more

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नंदिनी साळोखेचा यथोचित सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याची कुस्तीपटू  नंदिनी साळोखे हिला सन २२ / २३ चा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या कीर्तीत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुरगूडच्या सरपिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे संचालक हरिशश्चंद्र साळोखे यानी नंदिनीच्या निवासस्थानी जाऊन तिचा यथोचित सत्कार केला. या सत्कारप्रसंगी ते म्हणाले वयाच्या … Read more

प्रेमसंबंधावरून एकास लोखंडी रॉड ने मारहाण

मुरगूड ( शशी दरेकर ): कुरणी ता. कागल येथील मुलीबरोबर प्रेमसबंध असल्याच्या कारणावरुन सौरभ भरमा काबळे ( निढोरी ता – कागल ) यास इंडिका गाडीतून कुरणी येथील कालवा रोडला असलेल्या एका शेडमध्ये नेले. तेथे जातीवाचक शिवीगाळ करीत त्यास विवस्त्र करून तिघांनी लोखंडी रॉडने मारहाण तसेच अवघड जागेवर लाथेने मारहाण केली. यामध्ये सौरभ कांबळे हा जखमी … Read more

पहलगाम येथे झालेल्या घटनेचा मुरगूडमध्ये तीव्र निषेध

मुरगूड ( शशी दरेकर ) : काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यामधील २७ जणांना जीव गमवावा लागला. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुरगूड शहरातील नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून निषेध केला. तसेच या घटनेत मृत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काश्मीरमध्ये झालेला हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा आणि मास्टरमाईंड असणाऱ्या पाकिस्तानचा काळा चेहरा समोर आणणारा असा ठरला … Read more

कागल पंचायत समितीमध्ये पंचायत राज दिन साजरा

कागल  (विक्रांत कोरे) : कागल पंचायत समिती मध्ये 24 एप्रिल रोजी पंचायतराज दिन गटविकास अधिकारी कुलदीप भोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये स्वच्छता, विविध विषयांवर मार्गदर्शन, स्क्रीन वरती लाईव्ह पंतप्रधान मोदी यांचे मार्गदर्शन, सेवा हक्क कायदा याविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोदकुमार तारळकर म्हणाले, यशवंतराव … Read more

error: Content is protected !!