मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचे शानदार उदघाटन

उद्घाटन दिवशी ३१ लाख ठेवींचे संकलन मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचा शानदार उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. बुधवार दिनांक २०.०८.२०२५ रोजीच्या उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ३१ लाख ठेवीचे संकलन झाले. मुरगूड येथे अवघ्या सहा महिने कालावधीतच नावारूपाला व सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या मुरगूड … Read more

Advertisements

कागलमध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

कागल प्रतिनिधी: कागल मध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .सकाळी पादुका अभिषेक मकरंद सुर्यवंशी यांच्या हस्ते करणेत आला. संत सेना महाराज यांच्या फोटोचे पुजन कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले .कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी जननायक … Read more

मुरगूड येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी पतसंस्थेची ५० वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ ऑगष्ट रोजी

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल सुवर्णमहोत्सवी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेऊन सर्वांच्या विश्वासास पात्र असणारी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची ५० वी बार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .२४ / ८ / २०२५ रोजी दुपारी ठिक १२ वाजता श्रीराम मंगल कार्यालय ( भूते हॉल चिमगांव रोड ) येथे आयोजित करण्यात … Read more

के. डी. पाटील यांची EMSA कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : सौ. आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेजचे संस्थापक-अध्यक्ष के.डी. पाटील यांची महाराष्ट्र इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (EMSA) च्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. पाटील यांच्या कार्याची आणि योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सौ आंबूबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल अँड कॉलेज एक अग्रगण्य आणि प्रसिद्ध … Read more

राजर्षी शाहू सुविधा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्रांकडून जास्त शुल्क आकारल्यास होणार कारवाई

कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यात राजर्षी शाहू सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्र आणि आपले सरकार सेवा केंद्र अशी एकूण ७५ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत नागरिकांना महाराष्ट्र शासनाद्वारे दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले वितरित केले जातात. त्यासाठी शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क घेणे बंधनकारक आहे, मात्र काही केंद्र चालक निर्धारित शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारत … Read more

मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची  सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड नगरपरीषदेच्या वतीने पसायदान व संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची  सप्त शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी ७५० वी जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात  साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम राज्य शासनाच्या निदर्शना नुसार  नगरपरिषदेचे  मुख्याधिकारी  अतिश वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. नगरपरिषद कार्यालय , तसेच शहरातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये  पसायदानाचे आयोजन करुन प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत्तर  … Read more

कागलमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात ‘मतदार जागृती रॅली’

कागल (प्रतिनिधी) : कागल शहरात ‘आम्ही भारतीय लोक’ या संघटनेच्या वतीने निवडणूक आयोग आणि सत्ताधारी यांच्या संगनमताने होणाऱ्या ‘मतचोरी’ विरोधात एक भव्य ‘मतदार जागृती रॅली’ काढण्यात आली. ही रॅली शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होऊन संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत जाऊन परत गैबी चौकात तिचे सभेत रूपांतर झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, पंडित … Read more

मुरगूडची गोकुळ अष्टमी – चार पिढ्यांची परंपरा कृष्ण भक्तीचाअखंड वहातोय झरा

मुरगूड ( शशी दरेकर ):   मुरगूड  तालुका कागल येथे विश्वनाथराव पाटील घराण्याची श्रीकृष्ण जन्माष्टमीची चार पिढ्यांची परंपरा अव्याहत सुरू आहे. काळाच्या ओघात अनेक घडामोडी झाल्या असल्या तरी श्रीकृष्ण भक्तीचा हा झरा अखंड पणे सुरू आहे.      स्व.विश्वनाथराव पाटील हे स्वतः जसे कृष्ण भक्त होते तसे पंढरीच्या वारकरी संप्रदायाचे आधारवड सुद्धा होते.आद्य पूजेचा मान असणाऱ्या … Read more

स्वातंत्र्यदिनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते भाजपाचे भरत पाटील यांचा सत्कार; कोल्हापूरच्या औद्योगिक विकासावर चर्चा

प्रतिनिधी – (सलीम शेख): कोल्हापूर : १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा ‘भाजपा स्टार्टअप इंडिया’चे जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी भरत पाटील यांनी राज्यपालांना शाल, श्रीफळ आणि महाराणी ताराराणी यांचा पुतळा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. या … Read more

मुरगूडमध्ये पहिल्यांदाच दहीहंडीचा थरार

स्पर्धैत अजिक्य ठरणाऱ्या संघाला १ लाखाचे रोख बक्षीस मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूडात पहिल्यांदाच होणाऱ्या दहीहंडी स्पर्धेसाठीची तयारी पूर्ण झाली असून मुरगूडसह परिसराला या स्पर्धेविषयी प्रचंड औत्सुक्य निर्माण झाले आहे. कन्या शाळेच्या पटांगणावर या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षागॅलरी तयार करण्यात आली आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन उत्साहात या स्पर्धा पार पाडण्यासाठी संयोजन कमिटी रात्रंदिवस … Read more

error: Content is protected !!