फलटण येथिल महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्यानां फाशी व्हावी

मुरगूड ( शशी दरेकर ) मुरगूड पोलीस स्टेशनला शिवभक्त व नागरीकांचे निवेदन … फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येस कारणीभूत पीएसआय गोपाळ बदणे आणि प्रशांत बनकर यानां फाशी द्या या मागणीचे निवेदन आज शिवभक्त आणि मुरगुड ग्रामस्थांनी मुरगुड पोलीस स्टेशन येथे दिले. फलटण येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या हातावर मजकूर लिहून आत्महत्या … Read more

मुरगूडच्या राजर्षी शाहू पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर १ कोटी ७३ लाखावर ठेवीचे केले संकलन

कर्ज स्वरूपात फोर व्हिलर, टू व्हिलर अशा ५० गाड्यांचे केले कर्जवितरण मुरगूड ( शशी दरेकर ): स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या अशिर्वादाने व मा. खासदार संजयदादा मंडलिक तसेच युवानेते ॲड. विरेंद्र मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी मुरगूड ता. कागल येथिल सुवर्णमहोत्सवी राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेने दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर दि .२२/ १०/ २०२५ रोजी … Read more

मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस विभाग व अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) आणि सोनोग्राफी विभाग सुरु करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. माजी उपनगराध्यक्ष मुरगूड नगरपरिषद दगडू तुकाराम शेणवी, यांनी आरोग्य मंत्री, मा. प्रकाश आबिटकर यांना प्रत्यक्ष भेटून विनंती केली आहे. मुरगूड परिसरातील ३० ते ४० गावांतील लोकांच्या रोज ३०० ते ४०० ओपिडी  होत असते. … Read more

कागल मध्ये गारमेंटला आग, पन्नास लाखाचे नुकसान

कागल  प्रतिनिधी : कागल शहरात आंबेडकर नगर येथे गारमेंट शॉप आहे.ती शॉपी मध्यरात्रीच्या सुमारास  भीषण आगीत भस्मसात झाली. यामध्ये  रुपये ५० ते ६० लाखांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज विक्रम कामत (वय ३६, रा. आंबेडकर नगर, कागल) यांच्या मालकीचे दोन मजल्यांचे गारमेंट आहे .ते  आगीच्या … Read more

गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद निवडणूक: के. डी. पाटील यांचे नाव काँग्रेसच्या उमेदवार यादीत चर्चेत आघाडीवर

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ) :  कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गोकुळ शिरगाव जिल्हा परिषद मतदारसंघ पुरुष खुल्या विभागासाठी आरक्षित झाल्यानंतर काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर के. डी. पाटील यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेली २५ वर्षे कार्यरत असलेले के. डी. पाटील हे सौ.अंबूबाई पाटील इंग्लिश स्कूल, गोकुळ … Read more

कागलचे पोलिस निरीक्षक घावटे यांचा ठाकरे शिवसेनेमार्फत सत्कार

व्हनाळी : कागल पोलिस स्टेशन चे नुतन पोलीस निरीक्षक म्हणून गंगाधर घावटे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे त्याबद्दल त्यांचा  कागल तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पदाधिकारी, शिवसैनिकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.      यावेळी संभाजी भोकरे, शिवगोंडा पाटील, अशोक पाटील (बेलवळेकर) यांच्या हस्ते नुतन पोलिस निरीक्षक गंगाधर घावटे यांचा सत्कार करण्यात आला.   पोलिस निरिक्षक … Read more

मुरगूड नागरी सह. पतसस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण

मुरगूड ( शशी दरेकर ) : अल्पावधित नावलौकीक मिळवलेली मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे सभासदानां दिपावली भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सर्वेसर्वा हाजी धोंडीबा मकानदार होते. यावेळी पहिल्या पाच सभासद ठवीदारानां भेटवस्तूंचे वितरण संस्थेचे चेअरमन जावेद मकानदार, व्हा. चेअरमन मधूकर कुंभार, सुहास खराडे, निवास कदम, पांडूरंग कुडवे, या मान्यवरांच्या हस्ते … Read more

मुरगूड शहर जेष्ठ नागरिक संघात “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात

मुरगूड (शशी दरेकर) : मुरगूड ता. कागल येथिल मुरगूड शहर नागरिक संघात  ३१ आक्टोबर २०२५ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती “वाचन प्रेरणा दिन” म्हणून उत्साहात साजरी  करण्यात आली. प्रारंभी संचालक गणपतराव सिरसेकर यांचे हस्ते प्रतिमापूजन तसेच जेष्ठ नागरिक सदाशिव भारमल यांच्या हस्ते दिपप्रजलन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत इंजिनिअर सदाशिवराव एकल यानी … Read more

को.जि.मा.शि पतसंस्थेच्या मुरगूड शाखेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ

मुरगूड ( शशी दरेकर ): शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या कुशल नेतृत्वाखाली  कार्यरत असलेली कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांनी पतसंस्था सहकार क्षेत्राला दिशादर्शक आहे. संस्थेच्या माध्यमातून नऊ हजार ६०० सभासदांना सर्व सुविधा दिल्या जात असल्याचे प्रतिपादन संस्थेचे चेअरमन सचिन शिंदे यांनी केले. (को. जि.मा.शि. ) पतसंस्थेच्या  मुरगूड शाखेच्या दुसऱ्या मजल्याचा बांधकाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत … Read more

मुरगूडच्या मंडलिक महाविद्यालयातील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कु. वैष्णवी रवींद्र पोतदार प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये शहाजी लॉ महाविद्यालय कोल्हापूर ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रवींद्र पोतदार हीने प्रथम क्रमांक पटकावून ती सदाशिवराव मंडलिक चषकाची मानकरी ठरली. रूपये ५०००/-रोख  चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –द्वितीय क्रमांक -रु.३००१/- चषक … Read more

error: Content is protected !!