राजयोग आणि मेडिटेशनने ताणतणावाचे व्यवस्थापन करा : राजश्री बहेनजी

कागल/ प्रतिनिधी                आज सर्वांनाच ताण-तणावाला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक माणसाला मनशांतीची गरज आहे. मानवी कल्याण आणि शांतीसाठी दादी प्रकाशमणी  यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले आहे. प्रत्येकाने शांतीमय जीवनासाठी ताणतणावाचे व्यवस्थापन करावे. यासाठी राजयोग आणि मेडिटेशनची गरज आहे. असे प्रतिपादन कागलच्या ब्रह्माकुमारी सेंटरच्या राजश्री बहेनजी यांनी केले.         माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी … Read more

Advertisements

मुरगूड येथील युथ सर्कल तर्फे होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल युथ सर्कल मंडळ पाटील गल्ली यांच्यावतीने गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अभिनेत्री अस्मिता खटावकर यांच्या बहारदार सूत्रसंचालनाखाली सदरच्या स्पर्धा होणार आहेत. खेळ पैठणीचा होम मिनिस्टर स्पर्धा जिंकणाऱ्या महिलांसाठी प्रथम क्रमांक पैठणी व चषक तर दुसरा क्रमांक … Read more

मुरगूडच्या राजर्षि शाहू पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत

१५० कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण करणेचा व्यवस्थापकीय मंडळाचा संकल्प मुरगूड ( शशी दरेकर ) : खासदार दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेली आणि सद्या माजी खासदार संजयदादा मंडालिक व युवानेते ॲड. वीरेंद्र मंडलिक यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली उतूंग आर्थिक भरारी घेत असलेली शहरातील सुवर्ण महोत्सवी राजर्षि शाहू नागरी सहकारी पत संस्थेची ५० वी वार्षिक सर्व … Read more

कागलचे संजय भुरले उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित

कागल / प्रतिनिधी : कागल तलाठी कार्यालयात काम करणारे संजय भुरले यांना उत्कृष्ट महसूल सेवक म्हणून सन्मानित करण्यात आले .कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी केलेल्या सन 2024 ते 2025 या वर्षात उत्कृष्ट कामासाठीचा हा गौरव आहे.              संजय भुरले हे महसूल सेवक म्हणून कागलच्या तलाठी कार्यालयात काम करतात. महसूल … Read more

सुगंधा हाळजाळे-कोरे यांचे निधन

कागल /प्रतिनिधी :कसबा सांगाव, तालुका- कागल येथील श्रीमती सुगंधा हळजाळे यांचे  वार्धक्याने निधन झाले आहे. निधना समयी त्यांचे वय 104 वर्षाचे होते. उकॄष्ट कब्बड्डी कोच व नाभिक महामंडळाच्या कोल्हापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष एन डी कोरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले व मुलगी,सुना नातवंडे,जावई असा परिवार आहे.

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुरगूड पोलीस ठाण्याकडून रुट मार्च

मुरगूड ( शशी दरेकर ): आगामी गणेशोत्सव व ईद – ए – मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने मुरगूड पोलीस ठाण्याने मुरगूडसह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावातून रुट मार्च काढला. यावेळी एसटी स्टँड मुरगुड परिसर या ठिकाणी दंगल काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली .सदर दंगल काबू योजना प्रात्यक्षिक पार पडल्यानंतर मुरगुड एसटी स्टँड ,मुरगूड नाका- मुख्य बाजारपेठ ,कबरस्थान … Read more

गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याकडून रूट मार्च

गोकुळ शिरगाव (सलीम शेख ‌) : आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद (ईद-ए-मिलादुन-नबी) सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याने गोकुळ शिरगाव, कंदलगाव, उजळाईवाडी आणि कणेरी या गावांमध्ये रूट मार्च काढला. हा रूट मार्च दिनांक २२/०८/२०२५ रोजी दुपारी २:३० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडला. या रूट मार्चचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना … Read more

कर्नाटकच्या शरीर सौष्ठव स्पर्धेत कागलचा अभय बोते कास्यपदक विजेता

कागल / प्रतिनिधी: येथील अभय बोते यांनी आर्मेचर बॉडी बिल्डर अँड फिजिक स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाने बेंगळुरू कर्नाटक येथे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत कांस्य पदक पटकावले. ४० ते ५० वयोगटातील मास्टर कॅटेगरी ग्रुप १ मध्ये त्यांनी यश मिळवले आहे. भारत मास्टर प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेत या वयोगटात मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग … Read more

मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचे शानदार उदघाटन

उद्घाटन दिवशी ३१ लाख ठेवींचे संकलन मुरगूड ( शशी दरेकर ): मुरगूड तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर येथील मुरगूड नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिंगनूर शाखेचा शानदार उदघाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. बुधवार दिनांक २०.०८.२०२५ रोजीच्या उदघाटनाच्या पहिल्याच दिवशी ३१ लाख ठेवीचे संकलन झाले. मुरगूड येथे अवघ्या सहा महिने कालावधीतच नावारूपाला व सभासद ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या मुरगूड … Read more

कागलमध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

कागल प्रतिनिधी: कागल मध्ये संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली .सकाळी पादुका अभिषेक मकरंद सुर्यवंशी यांच्या हस्ते करणेत आला. संत सेना महाराज यांच्या फोटोचे पुजन कागल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रवीण काळबर यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समितीचे माजी सभापती रमेश तोडकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले .कार्यक्रमांचे अध्यक्ष स्थानी जननायक … Read more

error: Content is protected !!