सुळकूड : दिनांक 14 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल , सुळकूड तालुका – कागल या हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुमंगलम पंच- महाभूत लोकोत्सव दिनांक 20 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत होणाऱ्या लोकोत्सवानिमित्त सिद्धगिरी मठ येथे विद्यार्थ्यांनी श्रमदानातून सेवा केली. सिद्धगिरी मठाचे 49 वे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन सिद्धगिरी मठ नर्सरीमध्ये सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत श्रमदानातून सेवा करून एक वेगळा आदर्श जपला.
यावेळी आठवी, नववी, दहावी चे विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून 105 विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या श्रमदानामध्ये सहभाग घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक धामाण्णा सर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना सेवे संदर्भात मार्गदर्शन करून कामास सुरुवात झाली.
सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंदाने श्रमदान करून सेवा केली . स्कूल कमिटीचे सदस्य माननीय बाळासाहेब पाटील साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . सिद्धगिरी मठाचे अधिपती पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामींनी सर्व विद्यार्थ्यांना सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव संदर्भात माहिती सांगितली. मठाने आज पर्यंत अध्यात्मा सोबतच कृषी, पारंपारिक शिक्षण आरोग्य महिला सबलीकरण संस्कृती रक्षण व संवर्धन संशोधन आणि आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, याच संकल्पनेत ‘पर्यावरण’ रक्षणासाठी जगाला दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केलेला आहे.
याविषयी स्वामिजींनी सांगितले. याच श्रृंखलेत पर्यावरण रक्षणासाठी जगाला दीपस्तंभा प्रमाणे दिशादर्शक होईल असा सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सव आयोजित केलेला आहे .आज पर्यावरणीय हनीच्या घटना आपण पहात आहोत. सुनामी अतिवृष्टी भूकंप व महापूर यासारख्या अनेक समस्यांना आज जगाला तोंड द्यावे लागत आहेत आपण आज अशा उंबरठ्यावर उभे आहोत या आज जर आपण निसर्गाचा सर्वार्थाने विचार नाही केला तर येणाऱ्या काळात जगाला गंभीर पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागेल, यासाठी आपण जाणीव जागृती करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतलेला आहे. असे स्वामीनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी -विद्यार्थिंनी उपस्थित होते.