मुरगूड ( शशी दरेकर ): “पुराबरोबर वाहून आलेल्या
लाकडांचा बंधाऱ्यांना धोका. “
मुरगूडनजीक असणाऱ्या कुरणी बंधाऱ्यावरील वाहतूक पूराचे पाणी ओसरल्यानंतर पूर्ववत सुरु झालेली आहे.
पण पुराबरोबर वाहून आलेली लाकडे व इतर कचरा बंधाऱ्यास तटून रहातो व त्यामुळे मागे पाणी तुंबत जाते .या पाण्याचा दाब धरणावर पडून त्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
याबाबतचे मत कांहीं जल अभियंत्यांनी सुध्दा व्यक्त केलेली आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधताना हे तंत्रज्ञान वापरलेले आहे. मुरगूडचे माजी नगराध्यक्ष कै . विश्वनाथराव पाटील ( आण्णा )यांच्या संकलपनेतून देशातील पहिला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा वेदगंगेवर कुरणी जवळ साकारला आहे. सुरुपली , बस्तवडे हे बंधारे सुध्दा या प्रकारे तयार झाले आहेत.
पाणी निचरून जाण्याची सोय या बंधाऱ्यात आहे.
पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या कचऱ्याने हे पाणी तुंबून रहाते व मूळ तंत्र धोक्यात येते. येथील समाजसेवक शिवभक्तांनी व नागरीकानीं सुध्दा हीच बाब निदर्शनास आणली आहे.
धरण कृती समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुराबरोबर वाहून आलेली लहान, मोठी लाकडे त्वरीत काढावी व ही बाब गांभीर्याने घ्यावी अशी या सामाजिक कार्यकर्त्यांची व नागरीकांची मागणी आहे.