बातमी

करनूर मध्ये खुनी हल्ला

कागल(विक्रांत कोरे) : कागल तालुक्यातील करनूर येथे साठ वर्षे वयाच्या इसमाच्या डोक्यात अज्ञाताने कोयत्याचा वर्मी घाव घातला ल्यात तो गंभीर जखमी झालाआहे. डोक्यात कोयता अडकल्याने त्यास कोल्हापूरच्या सी पी आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास करनुर गाव ते शेख मळा दरम्यानच्या रस्त्यावर घडली . हल्लेखोर पसार झाले आहेत.गुलाब बाबालाल शेख वय वर्ष 60 असे गंभीर जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे.

     घटनास्थळास कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी भेट देऊन  घडलेल्या प्रकारणाची माहिती घेतली. सदरची घटना कोणत्या कारणावरून घडली हे अद्याप अस्पष्ट आहे .दरम्यान पैशाच्या देवघेवी वरून हा खुनी हल्ला झाला असावा अशी घटनास्थळी चर्चा होत होती.

      कोयत्याचा वर्मी घाव डोक्यात बसल्याने कोयता डोक्यातच अडकला. गंभीर जखमी अवस्थेत गुलाब यास कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात नेण्यातआले. तेथे त्यांच्यावर शस्तक्रिया करून कोयता काढण्यात आला आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

          कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार हे  रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणाचा कसून  तपास करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *