कागल(विक्रांत कोरे) :
कागल सह परिसरात गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या भक्तिमय वातावरणात झाले. संपूर्ण दिवसभर विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. सार्वजनिक तरुण मंडळां बरोबर घरगुती गणपती बाप्पांचे फटाक्यांच्या आतषबाजीत आगमन झाले.
गणेश चतुर्थी म्हटलं,की आनंदाची जनु गोड पर्वणीच असते.कागल सह परिसरात सकाळी सात वाजल्यापासूनच बाप्पांची मूर्ती नेण्याचे काम भक्तगण करीत होते .कागल शहरातील शाहू हॉल येथे कुंभार व्यवसायिकांनी गणेश मुर्त्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. कागल पालिकेने तशी त्यांची सोय केली होती. हॉलच्या दारात गणोबा, फळ विक्रेते,फटाके विक्रेते, सजावटीचे साहित्य ,पूजेचे साहित्य विक्रेत्यांनी स्टॉल मांडले होते. सकाळपासूनच गणपती बाप्पा नेण्यासाठी गर्दी झाली होती. गणपती बाप्पा मोरया..... गणेश गणेश मोरया.... च्या गजरात बापाला घरी आणण्यात आले. येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, राजे बँक, विविध संस्था ,विविध बँका यांनी मंत्र पुष्पांजली करीत पूजा करुन बाप्पांची प्रतिष्ठापना केली. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर घराघरात_ प्रांगणात सुहासिनीनी पंचारतीने ओवाळणी केली. भाकर तुकडा टाकला व श्री गणेशजीना घरात प्रवेश दिला.
बाप्पांची पूजा करण्यात आली आरती करणेत आली. गोड पुरणपोळीचा व खिरीचा नैवैद्य दाखविण्यात आला . सकाळ पासून गणपती बाप्पांचे आगमन केले जात होते. दिवसभर भक्तिमय वातावरणात आभारवॄध्द ,बालचमू रंगून गेले होते. भक्तिभावाने यथासांग पूजा केल्यानंतर कोरोणा सारख्या महामारीचा नाश व्हावा अशा पद्धतीचे साकडे बाप्पाना घालण्यात आले.