शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा

कोल्हापूर (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. सन २३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांनी ऑफलाईन अर्ज त्या त्या तालुक्यामध्ये शाळा प्रमुखांमार्फत तालुका निहाय आयोजित केलेल्या कॅम्पच्या ठिकाणी दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२३ या दिवशी सादर करावेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी  एस. एम. पोवार यांनी दिली आहे.

Advertisements

परिपुर्ण प्रस्ताव सकाळी ११ ते सांयकाळी ५ या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह स्विकारले जातील. विहीत कालावधीमध्ये प्रस्ताव सादर न केल्यास शिष्यवृत्ती पासून वंचित राहणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांची जबाबदारी शाळा मुख्याध्यापकांवर राहील. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील मुख्याध्यापकांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती तसेच प्रशासन अधिकारी, नगरपालिका, महानगरपालिका,शिक्षण मंडळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. पोवार यांनी केले आहे.

Advertisements
AD1

3 thoughts on “शालांत पूर्व दिव्यांग शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा”

Leave a Comment

error: Content is protected !!