व्हनाळी( वार्ताहर) : साके ता.कागल येथे पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी 1 यांच्या वतने समर्थ दुध संस्थेच्या प्रांगणात जनावारांची वैधत्व तपासणी शिबीर घेण्यात आले. जनावारांच्या विविध आजाराची तपासणी करून जंत नाशक औषधाचे मोफत वाटप ,म्हैस ,गाय यांचे वांझपणावर उपचार करण्यात आले. यावेळी गाय म्हैस दुध कमी होणे शिवाय जनावारांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी घ्य़ावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन उपचार व सुचना केल्या शिबीरात 200 जानवांरांची तपासणी करण्यात आली.
यावेळी पशुवैद्यकिय अधिकारी डॅा.एस.ए.जाधव,पशुधन पर्येक्षक डॅा.बी.वाय.पोवार, बाळासाहेब तुरंबे, निलेश निऊंगरे, रविंद्र जाधव, के.वाय. पाटील, संदिप पाटील आदी उपस्थीत होते.
डॅा.हिंदूराव पाटील, डॅा.ओंकार पाटील, डॅा.प्रविण कांबळे,डॅा.तानाजी निऊंगरे,डॅा.बाबुराव पाटील यांनी शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतेले.