भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांना समोर ठेऊन आदर्श अभियंता बना..!
श्री.आनंदराव आबिटकर इंजिनिअरींग कॉलेजच्या वेलकम डे प्रसंगी ह.भ.प. सचिनदादा पवार यांचे प्रतिपादन
गारगोटी(जोतिराम पोवार) : पाल ता. भुदरगड येथील या निसर्गरम्य व सुसज्ज कॉलेजमध्ये यावेळी बोलताना सचिनदादा म्हणाले, इंजिनिअरींगला प्रवेश म्हणजेअर्थ एका अर्थाने सेवेची देखील संधी असते.त्यामुळे आपण अन्यत्र लक्ष विचलित न होता चांगल्या गुणांनी हे शिक्षण पूर्ण केले पाहिजे. इंजिनिअर म्हणजे एकाचवेळी अर्थप्राप्ती व सामाजिक सेवा याचे माध्यम असते.
अभियंत्यांमुळेच मानवी जीवन सुसह्य.!
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांनी म्हैसूर, धुळे, पुणे, गुजरात असे देशभरात ते राजर्षी शाहू महाराजांच्या राधानगरी धरणाच्या निमित्ताने केलेले कार्य खूप महान आहे. १०२ वर्षाचे आयुष्य लाभलेला हा माणूस सर्व अभियंत्यांचा आदर्श असला पाहिजे. असे सांगताना त्यांनी सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनातील अनेक रोमांचक प्रसंग व त्यांचे या देशावर असलेले उपकार देखील सांगितले.
प्राचार्य अमर चौगुले यांनी आदरणीय दादांचा सत्कार केला. यावेळी प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी त्यांचे पालक,शिक्षक उपस्थित होते.