मुरगुड येथे अमेरिकन पाहुण्यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

मुरगुड येथील ऑफिस, सायलेज कारखान्याला दिली भेट

मुरगूड ( शशी दरेकर )

एन्व्हायरमेंट डिफेन्स फंड अमेरिकेतील संस्थेने बायफ व गोकुळ दूध संघाच्या मदतीने शिंदेवाडी येथील गौअग्रीदेटेक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनीला गेले वर्षभर वेगवेगळ्या योजनेतून चारा निर्मितीसाठी सहकार्य केले आहे. या सर्व कामाची पाहणी करण्यासाठी कंपनीच्या मुरगुड येथील ऑफिस, सायलेज कारखान्याला आज भेट दिली. शास्त्रज्ञांच्या या टीम मध्ये अँड्र्यू हँटसन, जॉन टाऊजल, एलिसन ईगल, डेरेक टेपे हे अमेरिकेहून तसेच डॉ. अभिनव व डॉ.उदय वडी हे दिल्लीहून आले होते. त्यांच्यासोबत बायफ रिसर्च फाउंडेशनचे डॉ. अक्षय जोशी, डॉ.सचिन जोशी डॉ.नवले गोकुळ दूध संघाच्या वतीने डॉ. दयावर्धन कामत उपस्थित होते.
यावेळी कंपनीचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
      

Advertisements


सुरुवातीलाच अमेरिकन पाहुण्यांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते विविध भारतीय चारा वनस्पतींचे वृक्षारोपण केले.त्यानंतर सायलेज कारखान्याचे प्रत्यक्ष कामकाज पाहिले व बरसिम आणि ओट या पिकांचे प्रात्यक्षिक प्लॉट पाहिले.
     
आज आलेले शास्त्रज्ञांचे शिष्ट मंडळ शेती व दूध व्यवसायात अभ्यास करत आहेत आणि जगभरात वेगवेगळ्या देशात आपला अभ्यासाचा आणि अनुभवाचा लाभ ते गौअग्रीटेक कोल्हापूर सारख्या संस्थांना देत आहेत.आपला परिसरात झालेले त्यांचे स्वागत औक्षण बांधलेला फेटा त्यांना दिलेले प्रेम पाहून अमेरिकन पाहुणे भारावून गेले.
 
यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी  गौअग्रीटेक कोल्हापूर वैरण कंपनीच्या कामाचा आढावा घेतला व एकूणच कामाचे कौतुक केले.

गौअग्रीटेक कोल्हापूर वैरण कंपनी परिसरातील शेती व दूध व्यवसायावर काम करत असून त्यानुसार येथील शेतकऱ्यांना व दूध उत्पादकांना नवनवीन योजना व मार्गदर्शन मिळवून देण्याचे अभिवचनही यावेळी त्यांनी दिले.

शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना प्रतापराव चिपळूणकर यांनी विना नांगरट शेती पद्धतीने तयार होणाऱ्या चाऱ्याची गुणवत्ता याबाबत माहिती दिली ती माहिती अमेरिकन शिष्टमंडळाने उत्सुकतेने जाणून घेतली तसेच निसर्गमित्र कोल्हापूरचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी चारा वनस्पती बद्दल माहिती दिली यावेळी सागर किल्लेदार, भिकाजी दाभोळे यांनीही मनोगत व्यक्त केली.

यावेळी शिंदेवाडी चे उपसरपंच अजित मोरबाळे ,पुंडलिक खराडे,
पी.टी ढेरे सर, तुकाराम शिंदे, तानाजी खराडे, सर्जेराव पाटील, संतोष खराडे,सचिन नायकवडी, ज्योतीराम कुंभार, रणजीत शिंदे, गजानन शिंदे उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक योगेश खराडे यांनी तर आभार सयाजीराव खराडे यांनी मानले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!