मुरगूडच्या नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाचा ” अमरनाथ दर्शन ” देखावा  बुधवारपासून पहाण्यासाठी खुला

मुरगुड ( शशी दरेकर ): अमरनाथ भारतातील जम्मू आणि काश्मीर राज्यातील पावित्र तीर्थस्थळ असून तेथे नैसर्गिक गुहा आहे. याच धर्तीवर मुरगूडच्या नव महाराष्ट्र क्रिडा मंडळाने ” अमरनाथ दर्शन ” हा देखावा तयार केला असून बुधवार ते शुक्रवार या तीन दिवशी संध्याकाळी ८ वाजता हा देखावा पहाण्यासाठी खुला असणार आहे अशी माहिती मंडळाचे प्रमुख सनी गवाणकर यानीं दिली.

Advertisements

गेले दीड महिना देखाव्याची तयारी करण्यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत होते. या देखाव्याची पूर्ण तयारी झाली असून  बुधवारपासून हा देखावा जनतेसाठी खुला करण्यात येणार आहे.

Advertisements

    नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाने  कृत्रिम डोंगर उभा करून त्यावर ३ फूट उंचीची ध्यानस्थ महादेव मूर्ती देखाव्याच्या सुरुवातीलाच उभारण्यात आली आहे. भुयारातून १५ फूट लांब बर्फाळलेल्या वाटेतून  दर्शकांना जावे लागते. त्यानंतर बर्फाच्या आकाराचे शिवलिंग अर्थात अमरनाथनाथाचे दर्शन होते. अमरनाथ यात्रेचा फील येण्यासाठी मंडळ या देखाव्याकरता रोज किमान पाच टन बर्फाचा वापर करणार आहे.

Advertisements

        नगरपालिकेसमोर आत्मरूप गणेश मंदिराची १९९७ मध्ये केलेली उभारणी हे मंडळाचे सर्वात मोठे काम असून मंडळातर्फे गणेश जयंतीला दरवर्षी दहा हजारावर गणेश भक्तांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. मंदिराचे नुकतेच नूतनीकरणही केले आहे.  कोणत्याही प्रकारची वर्गणी गोळा न करता सभासदांकडूनच जमा केलेल्या पैशातून सर्व उपक्रम मंडळ राबवत असते. १९८२-८३ साली स्थापन झालेले हे मंडळ आता ४३ वर्षे वयाचे झाले आहे.

  • SOLAR & USB CHARGING : Skypearll TPMS for cars is high efficiency solar power panel with USB charger cable. Double charg…
  • 6 ALARM METHODS : Provides 6 alarm methods: Fast leak alarm, Slow leak alarm, High pressure alarm, High temperature alar…
  • ADVANCED WIRELESS TPMS SYSTEM : The wireless installation and signal receiving. Allows tire pressure and temperature dat…
₹1,999

  आतापर्यंत मंडळाने वृंदावन गार्डन, झुलता पूल, वैष्णोदेवी दर्शन, स्वामी विवेकानंद स्मारक, शिवलिंग दर्शन, नैसर्गिक धबधबे या नैसर्गिक देखाव्यांबरोबरच अफजलखानाचा वध, गड आला पण सिंह गेला या ऐतिहासिक सजीव देखाव्यांचे सादरीकरण मंडळाने केले आहे.  रक्तदान, आरोग्य तपासणी, डोळे तपासणी आदी उपक्रमही मंडळ दरवर्षी राबवत असते. “अमरनाथ दर्शन” हा देखावा सर्वानीं आवर्जुन पहावा असे आवाहन नवमहाराष्ट्र क्रिडा मंडळाने केले आहे.
    

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!