मुरगूड ( शशी दरेकर ) : श्री भैरवनाथ मंदिर मौजे निढोरी ता.कागल येथे 37 वर्षाची परंपरा असणारा श्री रामजन्मोत्सव सप्ताह चैत्र शुक्ल 3 शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 ते चैत्र शुक्ल 10 गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 या कालावधीत संपन्न होणार आहे. हा निढोरीतील 38 वा रामजन्मोत्सव सप्ताह आहे. काकडआरती, ज्ञानेश्वरी पारायण,हरिपाठ,प्रवचन,किर्तन व उपस्थितांसाठी अन्नदान असे या सप्ताहाचे स्वरूप राहणार आहे.तरी निढोरी आणि निढोरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ह.भ.प श्री गुरुवर्य उद्धव जांभळे महाराज यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
या सप्ताहामध्ये सकाळी 5.00 वाजता काकड आरती,सकाळी 7.00 वाजता ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी 5.00 वाजता हरिपाठ,सायंकाळी 6.30 वाजता प्रवचन,रात्री 8.00 किर्तन व रात्री 10.00वाजता प्रसाद असा नियोजित वेळेप्रमाणे कार्यक्रम संपन्न होणार आहे.या कार्यक्रमामध्ये सलग सात दिवस रोज वेगवेगळ्या प्रवचनकारांचे प्रवचन व किर्तन होणार आहे.या सप्ताहामध्ये प्रवचने व किर्तने पुढीलप्रमाणे आयोजित केली आहेत.शुक्रवार 24 मार्च ह.भ.प मारुती भोसले महाराज (जोगेवाडी), शनिवार 25 मार्च ह.भ.प उदय शास्त्री महाराज (गोंटखिंडी),रविवार 26 मार्च ह.भ.प मधुकर पाटील महाराज (कावणे), सोमवार 27 मार्च ह.भ.प नारायण एकल महाराज (जोगेवाडी), मंगळवार 28 मार्च ह.भ.प सचिन संकपाळ महाराज (आळते), बुधवार 29 मार्च ह.भ.प तानाजी पाटील महाराज (कोरीवडे), गुरूवार 30 मार्च ह.भ.प बबन बेलेकर महाराज (पुष्पनगर) यांचा प्रवचनाचा व किर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या रामजन्मोत्सव सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच गुरूवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी ह.भ.प गुरुवर्य उद्धव जांभळे महाराज यांचे सकाळी ठिक 10.00 ते 12.00 यावेळेत रामजन्मोत्सवाचे किर्तन होईल.तर सायंकाळी प्रवचनानंतर दीपोत्सव होणार आहे व रात्री 11.00 ते 4.00 या वेळेत हरीजागर होणार आहे.यादरम्यान गुरूकृपा भजनी मंडळ व नरसिंह भजनी मंडळ यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.तर शुक्रवार दिनांक 31 मार्च 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प रामचंद्र जांभळे महाराज निढोरीकर यांचे काल्याचे किर्तन होईल व त्यानंतर सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजित केला आहे.या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचे सहकार्य बहुमोलाचे लाभते.अशी माहिती ह.भ.प गुरुवर्य उद्धव जांभळे महाराजांनी दिली.
हा रामजन्मोत्सव सप्ताह ह.भ.प उद्धव जांभळे महाराज व ह.भ.प राम जांभळे महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.या 24 मार्च ते 30 मार्च रोजी होणार्या सप्ताहाच्या अल्पोहार व अन्नदानाची व्यवस्था रामनवमी सप्ताह मंडळ,सचिन शिंदे,भैरवनाथ बागडे,बापुसो बुगडे,सुधीर सुतार, एम.डी.कळमकर,सागर चौगले, मधुकर मगदूम,पांडुरंग मगदूम,भैरु कोरे,हरी कोरे,राजेंद्र कळमकर,विठ्ठल लोहार, साताप्पा पाटील, दत्तात्रय भोसले, एम.बी.पाटील, संपत ढेरे, आनंदा रंडे, राजेंद्र नारे, शामराव सावंत, विठ्ठल भाकरे, पांडुरंग दळवी, साऊताई कोळी व महिला मंडळ यांनी केली आहे.