कागल (विक्रांत कोरे) : रामकृष्णनगर करनूर ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेस वीरेंद्र मंडलिक यांनी भेट दिली. शाळेत असणाऱ्या उणीवा लवकरात लवकर भरून काढू असे आश्वासन मंडलिक यांनी दिले. यावेळी त्यांनी गावातील पूरपरिस्थितीची पाहणी करून नागरिकांशी हितगुज साधले.
तसेच विद्यामंदिर रामकृष्णनगर शाळेस भेट देऊन. तेथील परिस्थितीची पाहणी केली.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी तेथील समस्या त्यांच्या समोर मांडल्या. समस्या सोडवण्याचे आश्वासन ॲड विरेंद्र मंडलिक यांनी दिले.तसेच खासदार संजय मंडलिक यांना भेटण्यासाठी त्यांनी सांगितले.
यावेळी सचिन घाटगे, अनिकेत भोसले, सचिन घोरपडे, संतोष कांबळे, पोलिस पाटील सुरज कांबळे, विनोद घाटगे, आशिष कांबळे तसेच शालेय समिती सौ.निशाली घाटगे, एकनाथ घाटगे, संदीप लुगडे, ईश्वरा घोरपडे, स्वप्निल सांगले, कुंभार सर, विद्या आयरे व सर्व शिक्षक वर्ग, तरुण कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
फोटो ओळ… करनूर : ता. कागल येथील रामकृष्णनगर विद्यामंदिर शाळेच्या विविध समस्यांची पाहणी करताना वीरेंद्र मंडलिक.