कागल / प्रतिनिधी: येथील अभय बोते यांनी आर्मेचर बॉडी बिल्डर अँड फिजिक स्पोर्ट्स फेडरेशन इंडियाने बेंगळुरू कर्नाटक येथे राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत कांस्य पदक पटकावले.
Advertisements
४० ते ५० वयोगटातील मास्टर कॅटेगरी ग्रुप १ मध्ये त्यांनी यश मिळवले आहे. भारत मास्टर प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.
Advertisements

या स्पर्धेत या वयोगटात मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. अभय बोते यांना भवानी प्रसाद साहू यांचे मार्गदर्शन व वडील माजी नगराध्यक्ष नवल बोते यांचे प्रोत्साहन लाभले.
AD1