मुरगूड (शशी दरेकर) : कागल तालुक्यातील बाळेघोल येथील तरुणाचा गावठी कट्ट्यातून गोळी झाडून खून केला.भरत बळीराम चव्हाण (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव आहे. काल सकाळी ही घटना घडली.भरतवर गोळी झाडणारा संशयीत आरोपी विकास हेमंत मोहिते (वय २५ ) हा स्वतःहून मुरगूड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
काल सकाळी भरत चव्हाण सेनापती कापशीला कामासाठी आपल्या मित्रासोबत जात होता.त्यावेळी समोरुन आलेल्या विकास मोहिते याने चिंगरे पाणंदीमध्ये भरतच्या डाव्या कानाजवळ गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याची प्राथमिक माहिती आहे.अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती समजते. पुढील तपास मुरगूड पोलिस करत आहेत .