टेम्पोने दिली मोपेडला धडक महिला गंभीर जखमी

कागल : कागल येथील खर्डेकर चौकातुन पुढे एस.टी. स्टॅन्डकडे जात असणारा MH-07-5694 या टेम्पो चा चालक अनिकेत मच्छिंद्र माळी (रा. मौजे सांगाव ता. कागल) याने टॅम्पो हयगयीने अविचाराने भरधाव वेगाने चालवुन खर्डेकर चौकातुन एस टी स्टॅण्ड कागल कडे जाणारे हर्षल नामदेव कांबळे यांच्या मोपेड ला धडक दिली.

Advertisements

यावेळी लता यांना गंभीर दुखापत झाली तर हर्षल यांना किरकोळ दुखापत झाली. त्यादरम्यान टेम्पो चालक अनिकेत मच्छिंद्र माळी हा जखमींना उपचारासाठी मदत न करता तेथून पसार झाला. सदर घटना दि.०५/०१/२०२३ रोजी घडली. कागल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सदर गून्हाचा तपास पो ना बी एन पटेकर, पोहे काँ ए एम पाटील करीत आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!