कागलजवळ भरधाव कार उलटून इचलकरंजीची महिला जागीच ठार

कागल: भरधाव वेगात असलेली इर्टिगा कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात इचलकरंजीतील महिला जागीच ठार झाली. समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकविताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रेखा मनोजकुमार केशरवाणी (वय ३६) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सहा वाजता कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीच्या मुख्य रस्त्यावर ही दुर्घटना घडली.

Advertisements

याबाबत माहिती अशी, इचलकरंजीतील पुजारी मळा राजमाता चौक येथील मनोजकुमार केशरवाणी हे पत्नी, दोन मुली, मुलगा आणि प्रमिला केशरवाणी यांच्यासह इर्टिगा कारने कर्नाटकात देवदर्शनासाठी निघाले होते. कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यावरून ते महामार्गावर जात होते.

Advertisements

दरम्यान एमआयडीसीच्या मुख्य रस्त्यावर महालक्ष्मी ट्रान्स्पोर्ट कंपनीसमोर समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला चुकविताना भरधाव वेगात असलेली कार दुभाजकाला जोरात धडकली व रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. कारच्या पुढील बाजूला बसलेल्या रेखा केशरवाणी यांच्या डोक्याला मोठा मार लागल्याने

Advertisements

त्यांचा जागीच मृत्यू झाला तर कारमधील मनोजकुमार यांच्यासह त्यांच्या दोन मुली, मुलगा आणि प्रमिला केशरवाणी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी कागल पोलिस दाखल झाले.

अपघातग्रस्त कार रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी प्रमिला यांनी मनोजकुमार यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. बेजबाबदारपणे कार चालवून रेखा यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मनोजकुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!