मडिलगे (जोतीराम पोवार ) : वाघापूर ता.भुदरगड येथील तब्बल 40 युवकांनी आषाढी एकादशीनिमित्त बोरीबेल ता. दौड, जि. पुणे येथील बाळूमामाच्या बकऱ्यातील बगा क्र. 9 येथील बकरी तळावर जाऊन गेली बारा वर्षांची सेवा बजावण्याची अखंड परंपरा कायम ठेवली येथील लाल बावटा तालुका संघटक बबन जठार व रामचंद्र भोई यांच्या मार्गदर्शनाखाली गेली बारा वर्षे आषाढी एकादशी निमित्त बाळूमामाच्या बकरी तळावर जाऊन तेथील साफसफाई, बकऱ्यांना लागणारा औषध उपचार,व नमः शिवाय, नमः शिवाय बाळूमामा नमः शिवाय हा जप तसेच विविध ठिकाणी बाळुमामाची बकरी चारण्याचा उपक्रम राबवतात.
यावेळी कारभारी आप्पा माळी यांनी येथील युवकांना मार्गदर्शन करताना मामांचा संदेश सांगताना सांगितले अरे माझ्या तळावर येऊन सेवा करणाऱ्या सेवकाच आयुष्य तर सुखाचं करीनच पण तो मेल्यावर नरकात गेला तरी स्वर्गात शिडी लावून त्याला स्वर्गात आणून ठेवीन हे बाळू धनगराचा दप्तर हाय, कुणाला स्वर्गात ठेवायचं आणि कुणाला नरकात ठेवायचं हे बाळू धनगराच्या दप्तरावर ठरतं मामांचा हा मौलिक सल्ला देताना त्यांनी येथील युवकांना व्यसनाधीनते पासून कसं दूर राहता आलं पाहिजे याचे महत्त्व पटवून दिले यावेळी बकरी तळावर भजन कीर्तन प्रवचन आधी सह महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून लाखो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेत पत्रकार जोतीराम पोवार यांच्यासह सागर दाभोळे, बिरदेव सावंत, रणजीत परीट, धनाजी कांबळे, किरण कांबळे, युवराज कांबळे, बिरदेव दाभोळे,अनिकेत बरकाळे , यशवंत सिंघम, समीर गायकवाड, सचिन कांबळे, धर्मेंद्र बरकाळे, प्रेमनाथ बरकाळे, उत्तम कांबळे, समाधान कुंभार, संतोष कांबळे, जोतीराम शिंदे, के डी बरकाळे, भिकाजी जठार, नंदू कांबळे, महेश जठार, शिवाजी जठार, दिगंबर कांबळे.. आबा, अंकुश आमते, नंदू कांबळे, महादेव मगदूम, बाजीराव भोई, अक्षय भोई, दिलीप जाधव , दिपक भोई, दिनकर गोसावी, प्रवीण भोई… भैय्या, रोहित भोई यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते