चिमगाव : गावामध्ये सापडलेल्या दुर्मिळ गोलाकार विरघळ शिळा

मुरगूड ( शशी दरेकर ) : चिमगाव (ता. कागल) येथील वैशिष्ट्यपूर्ण अशा गोलाकार वीरगळच्या संवर्धन कार्यास शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थ यांच्यावतीने सुरुवात करण्यात आली. या विरघळीचे संवर्धन करण्याचा शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी निर्धार करुन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम करण्यात आला.

Advertisements

मुरगुडपासुन २ कि. मी. अंतरावर असलेल्या चिमगावामध्ये महाराष्ट्रात दुर्मिळ अशा गोलाकार विरघळ आहेत. दीड वर्षांपूर्वी शिवशक्ती प्रतिष्ठानच्या निदर्शनास या वीरगळ शिळा आल्या. काही दिवसातच या विरगळींचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने शिवशक्ती प्रतिष्ठानने पाऊले उचलली. गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून व वीरगळींचे महत्त्व त्यांना सांगून याविषयी जनजागृती करण्यात आली. त्यानंतर या वीरगळीचे एकत्रित संवर्धन करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने रीतसर अशा लेखी परवाणग्या देखील घेतल्या. वर्षभर विविध बैठका, परवानग्या, कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर शिवशक्ती प्रतिष्ठान, चिमगांव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांनी विद्यामंदिर परिसरातील जागेमध्ये श्रीफळ वाढवून व कुदळ मारून भूमिपूजनाने या वीरगळ संवर्धनाचा श्रीगणेशा करण्यात आला.

Advertisements
चिमगाव : दुर्मिळ गोलाकार विरघळ शिकांच्या संवर्धन कामाच्या शुभारंभप्रसंगी शिवशक्ती प्रतिष्ठान व ग्रामस्थ

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष योगेश रोकडे, चिमगावचे सरपंच दीपक अंगज, उपसरपंच आनंदा चौगले, सर्जेराव अवघडे, आनंदा करडे, सागर भोई, प्रतीक जगताप, प्रशांत जाधव, संदीप पाडळकर, राजकिरण सावडकर, ओंकार पोतदार, सौ. संगीता फराकटे, सौ. अस्मिता चौगले, रेश्मा गुरव, सौ. कविता करडे, सौ. सुलोचना कांबळे, विनायक चौगले, समाधान सोनाळीकर, नंदू कदम, रवी जाधव, अवधूत कणसे, मनीष बडदारे, सोनाली मांगले, बाबुराव साठे, रणजित चौगले, श्रेयस कुरणे तसेच चिमगाव ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisements

शिवशक्ती प्रतिष्ठान, चिमगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीने विरघळ शिळांचे संवर्धन करून स्मारक उभारले जाणार आहे. त्यासाठीचा येणारा सर्व खर्च हा शिवशक्ती प्रतिष्ठान आणि चिमगाव ग्रामपंचायत ( ग्रामस्थ ) विभागून करणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारच्या गोलाकार वीरगळ फक्त चिमगावमध्येच आढळल्याचे जाणकार सांगतात. कागल तालुक्यातील असे पहिलेच स्मारक असून कागलच्या पर्यटन आणि ऐतिहासिक क्षेत्रात मानाचा तुरा ठरणार आहे. शिवशक्ती प्रतिष्ठांनने यापूर्वी जिल्ह्यात कसबा बीड (ता. करवीर) येथे ग्रामस्थांच्या मदतीने वीरगळ स्मारक उभारले असून चिमगावातही स्मारक उभारेल. असा विश्वास यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

AD1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!