कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना मुकेश राजेश शर्मा वय वर्ष 22 राहणार मगदापूर खिरी, मोहम्मद उत्तर प्रदेश या परप्रांतीयाचा वाहून जाऊन मृत्यू झाला. कोगनोळी टोलनाक्याच्या पुढे अपघात झाल्यानंतर लोक मारतील या भितीने सैराभैर होहुन दोन परप्रांतीय रस्ता मिळेल तिकडे धावत सुटले.
याच घाईगडबडीत करनूर तालुका कागल येथे कुमार विद्यामंदिर मराठी शाळे जवळील ओढा ओलांडताना वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा बुडुन मृत्यू झाला. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. मुकेश राजेश शर्मा (वय 22) रा. मगदापूर खीरी, मोहम्मद, उत्तर प्रदेश असे त्याचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र धर्मेंद्र राजीत राम धूरिया (वय 19) रा. गोसाई सिंहपूर, सुलतानपूर, उत्तर प्रदेश हे दोघे पुण्याहुन एका आयशर मधुन कामधंद्यासाठी चन्नईला जात होते. कागल पोलीसांनी स्थानिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह शोधुन काढला.
घटनास्थळावरून मिळालेली मााहिती अशी की, हे दोघे आयशरमध्ये बसून बेंगलोरला जात होते. कोगनोळी टोल नाक्याच्या पुढे या आयशरने एका मोटरसायकलला ठोकल्याने चालक व वाहक घाबरून वाहन रस्त्यात बाजूला सोडून शेतात पळून गेले. हे दोघे प्रवासीही घाबरून सैरभैर होऊन चारच्या सुमारास शेतातून वाट काढत करनूर या गावात आले पुन्हा महामार्गावर परत जाण्यासाठी ते रस्ता शोधत होते. ते गावांतील मराठी शाळेजवळ आले. येथे ओढा ओलांडुन पलीकडे महामार्गावर जाता येते हे लक्षात आल्याने घाबरलेल्या अवस्थेत पाण्यात उतरले. गेली दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने ओढा भरून वाहत आहे. मुकेश राजेश शर्मा याला पोहायला येत नसल्यामुळे तो वाहत जाऊ लागला. धर्मेंद्र धूरिया याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही. त्याने ओढ्यालगत असलेल्या गल्लीत येऊन आरडाओरड केली. गावकऱ्यांनी ओढ्याजवळ धाव घेतली पण तो पर्यंत मुकेश बुढाला होता. याची माहिती गावकऱ्यांनी कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांना दिली . जाधव वे तात्काळ पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. गावातील मोहम्मद शेख व शिवाजी घोरपडे यांच्या मदतीने पाण्यात मृतदेहाची शोधाशोध सुरू केली व वीस मिनिटात मृतदेह सापडला. याचा अधिक तपास कागल पोलीस करीत आहेत.
ग्रामस्थांमध्ये हळहळ
सैरभैर झालेले हे दोघे तरूण गल्लीतुन जात असताना अनेकांनी पाहिले. त्यातील एक बुडुन मेला. बातमी समजल्यानंतर मोठी गर्दी झाली होती. मृतदेह बाहेर काढते वेळी मित्राने फोडलेला हंबरडा पाहुन ग्रामस्थांच्याही डोळ्यात अश्र उभे राहिले. गावातील शिवाजी घोरपडे व महंमद शेख या दोघांनी पाण्यातुन मृतदेह शोधुन काढला.