मुरगूड ( शशी दरेकर ) : आजादी का अमृत महोत्सव न या विशेष उपक्रमांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे मंगळवार दिनांक ३० / ११ / २०२१ रोजी मला भावलेला समाज सुधारक, या विषयावर एक पात्री सादरीकरण सहा स्पर्धेचे आयोजन केले होते.
स्पर्धेचे उद्घाटन जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह श्री . अण्णासाहेब थोरवत यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन कुंभार होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले अशा नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी महाविद्यालय नेहमीच तत्पर असते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात . गत काळातील घटना महत्त्वपूर्ण व्यक्ती समाज सुधारक राजकीय नेते तत्व व्यक्ती विचारवंत यांच्या विचारांची कार्याची उजळणी होते व त्यातून सुजान आदर्श नागरिक तयार होण्यास सहकार्य होते.
इतिहास विभागाने प्रस्तुत स्पर्धा जिल्हास्तरावर ही आयोजित करावी असे प्रतिपादन केले सहभागी स्पर्धकांनी सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा सामाजिक राजकीय सुधारकांच्या भूमिकांचे सादरीकरण केले.
कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी येथील कुमार खिरकडे याने प्रथम क्रमांक दूध साखर महाविद्यालय बिद्री येथील संदीप साठे याने द्वितीय क्रमांक सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय येथील करण परीट याने तृतीय क्रमांक पटकावला.
प्राध्यापक शिवाजी होडगे श्री प्रवीण सूर्यवंशी व संदीप मुसळे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले या वेळी कर्मवीर हिरे महाविद्यालय गारगोटी, राधानगरी महाविद्यालय राधानगरी, भोगावती महाविद्यालय कुरुकली , दूध साखर महाविद्यालय बिद्री येथील स्पर्धक व प्राध्यापक उपस्थित होते. इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक पी. आर. फराकटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राध्यापक रणजीत पाटील यांनी आभार मानले तर जयसिंग कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.