चोरीचा छडा लावण्यात यश
कागल / प्रतिनिधी : काही दिवसापूर्वी पाण्याचे इंजिन व दोन मोटरसायकली चोरीस गेले होते. या चोरीचा छडा लावण्यामध्ये कागल पोलिसांना यश आले आहे. संग्राम शिवराम पाटील वय 32 राहणार पिराचीवाडी. तालुका कागल हे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून दोन मोटरसायकली व एक विहीरी वरील पाण्याचे इंजिन जप्त करण्यात आले.
कागल पोलिसां कडून मिळालेल्या माहितीनुसार कागल पोलीस ठाणे हद्दीमध्ये चोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याने चोरट्यास पकडण्याकरता मोहीम राबवली होती. काही दिवसांपूर्वी दगडू कृष्णात मांग राहणार साके तालुका कागल यांचे नरहरी देवस्थान समितीच्या मालकीची गट क्रमांक १०९५ मध्ये शेत जमीन आहे. कॉमेंट कंपनीचे पाणी उपसा करण्याचे इंजिन चोरीस गेले बाबत तक्रार दिली होती. अज्ञात चोरट्या विरोधात कागल पोलिसांमध्ये तक्रार नोंद करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाणे कडील पथकास मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी संग्राम शिवराव पाटील वय 32 राहणार पिराचीवाडी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदर तक्रारीतील चोरीस गेलेले इंजिन व दोन मोटरसायकली आपण चोरले असल्याचे कबूल केले. आरोपीकडून दोन मोटर सायकली व इंजिन जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई कोल्हापूर चे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई. उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग कोल्हापूर संकेत गोसावी. यांच्या मार्गदर्शनाखाली कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार. साहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती करपे. पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे. पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके. पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील, पोलीस आमलदार विकास चव्हाण, पोलिस आमलदार सुनील कांबळे, पोलिस आमलदार सावंत, पोलिस नाईक रानगे यांनी ही कारवाई केली.