म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न – नविद मुश्रीफ
कागल : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.कोल्हापूर (गोकुळ) यांचे वतीने कागल तालुका संपर्क सभा श्री. आर. के. मंगल कार्यालय, बामणी तालुका कागल येथे आयोजित केली होती.
या कार्यक्रमासाठी गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष श्री. अरुणकुमार डोंगळेसो, माझे अध्यक्ष श्री. विश्वासराव पाटील (आबाजी) तसेच कागल तालुक्याचे संचालक श्री. नविद मुश्रीफ साहेब, श्री. युवराज पाटील (बापू), श्री.अमरिषसिंह घाटगे, तसेच सर्व संचालक – संचालिका, गोकुळचे कार्यकारी संचालक श्री.योगेश गोडबोले, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी, तसेच कागल तालुक्यातील सर्व दूध संस्थेचे पदाधिकारी, सचिव, कर्मचारी उपस्थित होते.
म्हैस दूध वाढीसाठी सर्व संस्था प्रतिनिधी यांनी प्रयत्न करावेत. लम्पीचा आजार, वैरण विकास, पशुसंवर्धन, संस्था प्रतिनिधी यांनी आपल्या अडीअडचणी बाबत सूचना केल्या. प्रास्ताविक नविद मुश्रीफ यांनी केले. अरुणकुमार डोंगळे, विश्वासराव पाटील (आबाजी), युवराज पाटील (बापू) व अमरिषसिंह घाटगे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.