व्हनाळी ः सागर लोहार
केनवडे ता.कागल येथील श्री अन्नपुर्णा शुगर अॅण्ड जॅगरी वर्क्स या कारखान्याने ऊस उत्पादकांना पहिल्याच गळीत हंगामात एकरकमी 2903 रूपये प्रतिटनास दर जाहिर केल्याबद्दल संस्थापक चेअरमन माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा केनवडे-गोरंबे,साके,व्हनाळी,सावर्डे येथील ऊस उत्पादक शेतक-यांनी सत्कार केला. प्रस्थाविक इतर कारखान्यांच्या थोड्याफार फरकाने बरोबरीत दर दिल्याने संजयबाबा घाटगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सध्या या दरामुळे शेतक-यात चैतण्य पसरले असून दराबरोबरच वेळेत ऊस उचल होत असल्याचा मोठा फायदा यामुळे शेतक-यांना झाला. परंतू हे सगळ होण्याआधी संजयबाबा घाटगे यांनी शेतक-यांच्या हिताचा विचार करून जो दर निघेल तोच दर काढून सर्वांना सुखद धक्का दिला आणि सभासदांसह ऊस फत्पादकांचे हित जोपासले यामुळे पंचक्रोशीतील शेतक-यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाच शिवाय त्यांचा गावोगावी डिजीटल फलक लावून कारखाना कार्यस्थळावर येवून सत्कार केला.
केनवडे-गोरंबे, साके, व्हनाळी आदी गावातील शेतक-यांनी तर ख-या आर्थाने दिवाळीपुर्वीच दिवाळी साजरी केली. अन्नपुर्णा शुगरच्या गळीत हंगामाला १० तारखेपासून सुरूवात झाली. प्रतिदिन 1000 ते 1100 मेट्रीकटण यवढ्या क्षमतेने गाळप सुरू आहे. सर्व ऊस उत्पादकांना समान न्याय देत 7 शेतीविभागीय कार्यालयामार्फत ऊसाची तोडणी वाहतुक यंत्रना सुरू आहे. उत्पादीत गुळपावडरला चांगली बाजारपेठही उपलब्ध आहे. यावेळी कार्यकर्ते ज्ञानदेव पाटील, किरण पाटील, अशोक पाटील, चंद्रर निऊंगरे, मोहन गिरी, साताप्पा आगळे,शिवसिंग घाटगे, विश्वास दिंडोर्ले, भैरू कोराणे, कृष्णात बोडके, उत्तम वाडकर, सुरेश मर्दाने, एम.टी.पोवार, आकाराम बचाटे, पप्पू पोवार, भगवान पोवार आदी उपस्थित होते.
टनेज बरोबर अंतरपिकाचा हंगाम…
अन्नपुर्णा शुगरमुळे या परिसरातील शेतक-यांचा ऊस वेळेत उचल होत आहे. त्याशिवाय ऊस लवकर गेल्याने अंर्तपिकांचा हंगाम मिळाल्याने शेतक-यांचा फायदा होत आहे. शिवाय ऊसाची वेळेत उचल झाल्याने टनेज देखील वाढले असल्याचे शेतकरी सत्काराच्यावेळी बोलून दाखवत आहेत. असा तिहेरी फायदा शेतक-यांना या कारखान्यामुळे होत आहे.
हा कारखाना म्हणजे तालुक्यातील तमाम स्वाभिमानी कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतक-यांची अस्मिता आहे. विश्वस्त म्हणून ही अस्मिता जपण्याचे प्रामाणिक कार्य आम्ही करू आणि शेक-यांना न्याय देत राहू.
संजयबाबा घाटगे ः संस्थापक,चेअरमन श्री अन्नपुर्णा शुगर,केनवडे