सिटी प्राईड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे अद्ययावत आणि प्रगत बालशस्त्रक्रिया विभाग सुरू

विख्यात बालशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. जाधव दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी येणार कागलला

कागल : कागल मधील रुग्णप्रिय सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, येथे आता अद्ययावत आणि प्रगत बालशस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला आहे. कोल्हापुरातील प्रसिद्ध अॅस्टर-आधार हॉस्पिटल येथील विख्यात बालशस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. अमितकुमार जाधव हे दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आता सिटी प्राईड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कागल येथे उपलब्ध असतील.

Advertisements

डॉ. अमितकुमार जाधव हे लहान मुलांमधील जन्मजात विकृती व गुंतागुंतीच्या आजारावर शस्त्रक्रियेने उपचार करण्यासाठी ओळखले जातात. आजवर त्यांनी हजारो मुलांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. कागल आणि परिसरातील लोकांना आता मुलांच्या किचकट आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कागलमध्येच यशस्वीपणे करता येणार आहेत असे सिटी प्राईड हॉस्पिटल चे कार्यकारी संचालक डॉ तुषार भोसले यांनी सांगितले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!