मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथिल सर्वांच्या परिचयाची आणि आदर्श सहकारी पतसंस्था गौरव पुरस्कारप्राप्त ” श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन संचालकपदी श्री . निवास पांडूरंग कदम तर नूतन संचालीकापदी सौ . सुनंदा सुरेश जाधव यांची निवड झाले बद्दल त्यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या मुख्य कार्यालयात पार पडला.
याप्रसंगी संस्थेचे सभापती श्री . किरण गवाणकर म्हणाले संस्थेच्या पारदर्शक कारभारामुळे संस्था नावारूपास आलेली आहे . नूतन संचालकानी संस्थेसाठी योगदान देऊन संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रयत्नशिल रहावे .
यावेळी संचालक प्रशांत शहा यानी मनोगत व्यक्त केले. या नूतन संचालकांच्या सत्कार प्रसंगी उपसभापती श्री . प्रकाश सणगर, संचालक सर्वश्री किशोर पोतदार, साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर, नामदेवराव पाटील, प्रदिप वेसणेकर, हाजी धोंडीराम मकानदार, संदीप कांबळे, संचालिका सौ. रोहिणी तांबट, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह कर्मचारी, महिला कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या निवडप्रसंगी नूतन संचालक, नूतन संचालिका यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.