राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी (june 2023)

कोल्हापूर : भारतीय हवामान हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः ७ जूनच्या दरम्यान होणे अपेक्षित होते. यापूर्वी ११ जून २०२३ रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. दि. २४ जून २०२३ रोजी राज्यात बहुतांश भागात पावसास सुरुवात झाली आहे.

Advertisements

सध्यस्थितीत दि.२५ जून, २०२३ अखेर सरासरी पर्जन्यमान १७३ मिमी असून प्रत्यक्षात मात्र ४१.९ मिमी (सरासरीच्या २४.२टक्के) पाऊस पडलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र १५२.९७ लाख हेक्टर असून दि. २४.०६.२०२३ अखेर प्रत्यक्षात २.२६ लाख हेक्टर (१.६० टक्के) पेरणी झालेली आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामास वेग येईल.

Advertisements

खरीप हंगाम २०२३ करीता १९.२१ लाख क्विं. बियाणे गरजेच्या तुलनेत सद्यस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विं.बियाणे उपलब्ध आहे. राज्यात १४,६९,९९३ क्विंटल (७६%) बियाणे पुरवठा झालेला आहे. त्यामुळे राज्यात खरीप हंगामात करिता आवश्यक बियाणे साठा उपलब्ध आहे.

Advertisements

खरीप हंगाम २०२३ करिता राज्यास ४३.१३ लाख मे. टन खतांच्या पुरवठ्याचे नियोजन मंजूर असून त्यापैकी आतापर्यंत १२.८१ लाख मे. टन खतांची विक्री झालेली आहे. सद्यस्थितीत राज्यात २८.५०लाख मे. टन खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी.

दिनांक २३ जून २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये एक रुपयात पिक विमा अर्थात “सर्व समावेशक पीक विमा” योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. त्याचा राज्यातील शेतकऱ्यांना लाभ होईल.

२५ जून ते १ जुलै २०२३ या कालावधीत राज्यभरामध्ये कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील महत्त्वपूर्ण पिकांचे लागवड तंत्रज्ञान, जमिनीचे आरोग्य आणि खतांचा संतुलित वापर, कृषी प्रक्रियेच्या विविध योजना, पौष्टिक आहार प्रसार, राज्यातील महिला शेतकऱ्यांचा सन्मान यासारख्या विविध मोहिमा राबविण्यात येणार आहेत. शेतकरी बांधवांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

राज्यामध्ये आवश्यकतेनुसार बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर पेरणी करावी असे आवाहन राज्याचे मा. आयुक्त कृषी श्री. सुनील चव्हाण यांनी राज्यातील शेतकऱ्यांना केलेले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!