मुरगूड ( शशी दरेकर ) : देशाचे तत्कालीन उपपंतप्रधान,महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांची दूरदृष्टी लाभलेला लोकनेता म्हणजे स्व. खा. सदाशिवराव मंडलिक साहेब -होय! जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी जाणीव पूर्वक लक्ष देऊन त्या योजना शेतकरी,कष्टकरी, यांच्यासाठी त्यानी अमलात आणल्या. डोंगराळ भागात शिक्षण संस्था काढून गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय स्व.खा.मंडलिकसाहेबांनी केली आहे. असे प्रतिपादन गारगोटी येथील मौनी विद्यापीठाचे माजी संचालक व मंडलिक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयंत कळके यांनी केले.
ते लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८७ ०या जयंती निमित्त सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड येथे आयोजित करण्यात आलेल्या आॅनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार होते मंडलिकसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले.
आॅनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक प्रा. डॉ.शिवाजी होडगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले की, सलग १९ वर्ष ही चालू असलेली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा कोरोना परिस्थितीत आॅनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठेवल्याचा आनंद होत आहे. राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन डॉ.अर्जुन कुंभार यांनी यावेळी केले. या कार्यक्रमासाठी साठी उपप्राचार्य डॉ. टी.एम . पाटील, डॉ. महादेव कोळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते. आभार प्रा.पी.एस.सारंग यांनी मांनले, तर सूत्रसंचालन प्रा.सुरेश दिवाण यांनी केले.