राशिवडे(प्रतिनिधी) : शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्था, राशिवडे बु, कै. अमर आनंदराव पाटील शिक्षण संस्था आणि मा. खा. सदाशिवराव मंडलिक माध्यमिक विद्यालय, कांबळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कांबळवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. अभ्यास केंद्राचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ. सोनाली पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कै. अमर आनंदराव पाटील यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमा पुजन गोकुळ दुध संघाचे संचालक मा. प्रा. श्री. किसनराव चौगले साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संपत गायकवाड याच्या हस्ते संगणक प्रदान सोहळा संपन्न झाला . प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. एस. बी. कुरणे यांनी केले.
स्वच्छता अभियानात राज्यात अग्रेसर ठरलेल्या कांबळवाडी गावात आलेली मरगळ आता झटकून द्यावी . आणि कांबळवाडी गाव हे अधिकाऱ्यांचं गाव व्हावं यासाठी युवकांनी या वाचन कट्ट्याचा आधार घ्यावा असे उद्गार संपत गायकवाड यांनी काढले . यावेळी गोकुळ संचालक प्रा किसनराव चौगले,शिवम संस्थेचे विश्वस्त प्रा. ए एस भागाजे सर, प्रा पी. डी. मिसाळ सर, शिवम शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मा. दिगंबर टिपुगडे सर, सभापती सोनाली पाटील विविध मान्यवर यांनी मनोगते व्यक्त केली.
इयत्ता दहावी आणि NMMS परिक्षेत आणि क्रीडा क्षेत्रात उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार कै अमर पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक हिंदुराव पाटील, कार्याध्यक्ष दिपकराव पाटील, माजी सभापती दिलीप कांबळे, माजी सभापती दिपाली पाटील, शिवमचे विश्वस्थ विजयराव मगदूम, सुहास तोडकर, नवनाथ टिपुगडे , शिवाजी पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन श्री. एस. व्ही. मिसाळ सर यांनी केले.उपस्थितांचे आभार श्री. एम. पी. पाटील सर यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.