मोटरसायकलला अडकलेली पैशाची पिशवी पळवली
कागल (विक्रांत कोरे) : मुंबईकडे जाणार रस्ता कोणीकडे असा बहाना करीत अज्ञात दोन्ही इसमानी मोटरसायकल अडकलेली रुपये 65 हजाराची पिशवी घेऊन पोबारा केला. ही घटना दुपारी पावणे बाराच्या सुमारास रिंग रोडवर घडली. दिवसाढवळ्या भर दुपारी झालेल्या प्रकाराने घबराहट निर्माण झाली आहे. कागल पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.
कागलचे पोलीस म्हणतात कागलच्या पाझर तलावाजवळ राहणारे 73 वर्षाचे प्रकाश विष्णू पाटील हे आपल्या मोटरसायकल वरून रिंगरोड वरून जात होते. दरम्यान अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व डोक्याला काळी टोपी असलेला 45 वर्षाचा इसम तिथे आला. त्याने पाटील यांना मुंबईकडे जाणारा रस्ता विचारला. दरम्यान त्याचवेळी अंगात निळ्या रंगाचा शर्ट घातलेला दुसरा इसम मोटरसायकल घेऊन तिथे आला. या दोघांनीही मुंबईचा रस्ता विचारण्याचा बहाणा केला आणि मोटरसायकलला अडकलेली रुपये 65 हजाराची पिशवी चुटकीसरशी घेऊन तिथून धूम ठोकली.
कागल बसस्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रिंगरोडवर दिवसाढवळा हा प्रकार घडला आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली आहे. कागल पोलिसांसमोर हे जणू आव्हानच आहे. पोलीस नाईक श्री औताडे हे पुढील तपास करीत आहेत.