मुरगुड (शशी दरेकर) : मुरगूड येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजचा एचएससी तथा बारावी बोर्ड परीक्षा २०२२ चा एकूण निकाल ९७.५९ टक्के इतका लागला. वाणिज्य शाखेचा साहिल संजय सूर्यवंशी पिंपळगाव बु॥ हा विद्यार्थी ९२.६७ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत कागल तालुक्यात दुसरा आला. आरती परशराम गिरीबुवा वाघापूर ही ८०.५० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात कला शाखेत प्रथम आली.
शिवराजचे २४१ मुले आणि २१६ मुली असे एकूण ४५७ विद्यार्थी बारावी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. ४ विद्यार्थी परीक्षेत गैरहजर राहिले. २३३ मुले आणि २१३ मुली असे ४४६ जण उत्तीर्ण झाले. मुलांचे ९६.६८ तर मुलींचे ९८.६१ असे उत्तीर्णचे प्रमाण राहिले. शाखा निहाय निकाल असा- सायन्स विभाग २०७ पैकी २०६ उत्तीर्ण (९९. ५१%) कॉमर्स विभाग ७४ पैकी ७३ (९८.६४%), आर्टस् विभाग- १७६ पैकी १६७ उत्तीर्ण (९४.८८%), व्होकेशनल विभाग- ४५पैकी ४२ उत्तीर्ण (९३. ३३ %).
शाखा निहाय गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी असे- कॉमर्स शाखा- साहिल संजय सूर्यवंशी पिंपळगाव बुद्रुक (९२.६७ ), वैष्णवी यशवंत हळदकर मुरगूड (८१.६७), वैष्णवी बाजीराव कुंभार वाघापूर (८१.५०), आर्ट्स विभाग- आरती परशराम गिरीबुवा वाघापूर (८०.५०), स्वाती बापूसो मगदूम बेनिग्रे (७२.३३), अनुराधा संजय कणसे बोळावी (७०.८३), सायन्स विभाग- वैष्णवी महेश पाटील भडगाव (७९.८३), अनुजा सुरेश शिंदे मुरगुड (७७.८३) समृद्धी शिवाजी चित्रकार मुरगुड (७७.१५). व्होकेशनल विभाग- तरटे स्वाती पांडुरंग ( ६२.५०), गोसावी विद्या रावसो (५८. ८३), पार्टे प्रकाश पांडुरंग (५७.५०).
सेक्रेटरी खासदार संजय मंडलिक, कार्याध्यक्ष वीरेंद्र मंडलिक, अध्यक्ष गजानन गंगापूरे, कार्यवाह आण्णासो थोरवत यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य पी. डी. माने, उपप्राचार्य रवींद्र शिंदे, व्होकेशनल विभाग प्रमुख एस. एन. अंगज, सर्व विषय शिक्षक यांचे मार्गदर्शन मिळाले.