महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या – शिवसेनेचे निपाणी सीपीआय शिवयोगी यांना निवेदन

साके (सागर लोहार) : कर्नाटक निपाणी सीमा भागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली,लिंगनूर,मुरगुड,गलगले, अर्जुनी, ही गावे निपाणी ला लागून आहेत. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटक सीमेलगत असलेल्या गावातील नागरिक व्यापारी शालेय विद्यार्थी महाराष्ट्र कर्नाटक असा प्रवास करत असतात. पण गेल्या काही दिवसापासून कर्नाटकचे पोलीस इथे थांबत असल्याने या मार्गावरून मुरगुड – निपाणी एसटी बसला कर्नाटकात प्रवेश बंदी असल्यामुळे महाराष्ट्र एसटी ची कर्नाटक पोलीस अडवणूक करतात त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना लिंगनूर येथे उतरून पाच-सहा किलोमीटर चालत कर्नाटकच्या देवचंद कॉलेजमध्ये जावे लागते.

Advertisements

शिवाय अनेक प्रवासी निपाणी ला जाणारे देखील या ठिकाणी उतरून चालत जात आहेत त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल आणि शालेय विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान पाहून संबंधित कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्यावा या मागणीचे लेखी निवेदन कागल तालुका शिवसेनेच्यावतीने तालुका प्रमुख अशोकराव पाटील बेलवळेकर यांनी निपाणी पोलीस स्टेशनचे सीपीआय एस. व्ही. शिवयोगी यांना दिले आहे. निवेदनावर कोल्हापूर जिल्हा मनसेचे उपाध्यक्ष रोहन निर्मळ, मानवाधिकार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष जयसिंग टिकले यांच्या सह्या आहेत.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!