कागल /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व अनुज् चेस अॅकॅडमीच्यावतीने डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या एकदिवसीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 5 फेऱ्या घेण्यात आल्या. ऋषीकेश कबनूर याने 4.5 (प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. शशिकांत कबनूरकर 4.5(प्रोग्रेसिव्ह) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले. या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे
तृतीय क्रमांक तन्मय पवार 4 (प्रोग्रेसिव्ह) गुण
चौथा क्रमांक शशांक वाघमारे 4 (प्रोग्रेसिव्ह) गुण
पाचवा क्रमांक कौस्तुभ गोटे 4 (प्रोग्रेसिव्ह) गुण.
उत्तेजनार्थ बक्षीसे अंशुमन शेवडे, अथर्व उरुणकर, स्वरुप चौगले व विद्या पाटील यांना देण्यात आले. स्पर्धेमध्ये एकूण 26 स्पर्धकांनी सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी पंच म्हणून श्री कृष्णात पाटील, बाबूराव पाटील व सुर्यकांत चोडणकर यांनी काम पाहिले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मा. आम बंटी पाटील साहेब, मा. आम रूतुराज पाटील साहेब व डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर चे प्रिंसीपल डॉ सुरेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शशिकांत कबनूरकर व सर्वेश सुतार यांनी परिश्रम घेतले.