समृद्धी दुध संघाची 1 कोटीची थकीत बीले आदा
साके (सागर लोहार): माजी आमदार संजयबाबा घाटगे गटावर प्रमे करणा-या तमाम निष्ठावंत कष्टकरी प्रामाणिक शेतकरी सभासदांनी समृद्धी दुध प्रकल्प उभारणीसाठी शेअर्स खरेदी करून आपले योगदान निष्ठेने दिले आहे. त्यांचे हे योगदान वाया जावू देणार नाही. त्यांना घेतलेल्या शेअर्स रकमेचा परतावा देण्यासाठी आम्ही कटीबद्द आहोत असे प्रतिपादान गोकुळचे संचालक,जि.प.सदस्य अंबरिष घाटगे यांनी केले. व्हनाळी ता. कागल येथे समृद्धी दुध प्रकल्पाच्या 1 कोटी थकीत बीलाच्या वाटप प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी समृद्धी दुध प्रकल्प दुध पुरवठा करणा-या दुध संस्थांचे दुधबील रक्कम 64 लाख 64 हजार 414 तसेच कामधेनू पतसंस्था कर्ज रक्कम रूपये 22 लाख, कामगार वेतन 4 लाख 63 हजार 128 व वाहतुक ठेकेदारांचे बील 6लाख 47 हजार 997 व व्यापीर देणे 2 लाख 72 हजार 604 इतक्या थकीत असलेल्या सुमारे 1 कोटी 48 हजार रूपये रकमेचे वाटप गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
अंबरिष घाटगे पुढे म्हणाले, समृद्धी प्रकल्पाचे कर्मचा-यांचे वेतन व दुधबील,बॅंक कर्जे,वाहतुक ठेकेदारांचे भाडे देण्यासाठी थोडाफार विलंब झाला होता. भविष्यात शेअर्स घेतलेल्या सभासदांना परतावा लवकरच देणार आहे. अन्नपुर्णा व समृद्धी दुध प्रकल्प हा पंचक्रोशितील तसेच तालुक्यातील तमाम शेतकरी कार्यकर्ते यांच्या त्यागातून उभारला गेला आहे. यापुढे देखील संस्थांच्याप्रती असणारा त्याग आम्ही कधीही विसरणार नाही असे गैारवउदगार श्री घाटगेंनी व्यक्त केले.
यावेळी जयंत पाटील,सुर्यंक्रात वळीवडे,अरूण तोडकर,विलास केळकर,राजेंद्र तळेकर,नामदेव एकशिंगे,जगनाथ सडोलकर,साताप्पा मगदुम,अरूण म्हातुगडे,अनिल पाटील,नितीन दंडवते,सुनिल वाडकर,शिवाजी पाटील, कृष्णात परीट आदी कर्मचारी उपस्थीत होते.